शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : डोळ्यांच्या माध्यमातून शरीरावर हल्ला करतो कोरोना, वैज्ञानिकांना सापडलं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 4:00 PM

1 / 8
कोरोना व्हायरस डोळ्यांच्या माध्यमातून शरीरावर हल्ला करू शकतो, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांच्या टीमने शोधलं की, डोळ्यांच्या ACE-2 रिसेप्टर्सच्या माध्यमातून व्हायरस शरीरात शिरतो.
2 / 8
शरीरातील सेल्स संक्रमण होण्यासाठी ACE-2 रिसेप्टर्सला गेटवे मानलं जातं. व्हायरस यांच्या माध्यमातून शरीरावर अटॅक करतो. ACE-2 रिसेप्टर्स फुप्फुसं, रेस्पिरेटरी ट्रॅक्टसोबतच शरीराच्या इतर अंगांमध्ये असतो.
3 / 8
असे मानले जात आहे की, याच कारणाने कोरोना व्हायरसच्या अनेक रूग्णांमध्ये Conjunctiivitis ची लक्षणेही दिसली. यादरम्यान रूग्णांचे डोळे लाल झाले होते.
4 / 8
वैज्ञानिकांचं असं मत आहे की, अश्रूंच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांनी लिंग्ली झोऊ यांच्या नेतृत्वात कोरोना डोळ्यातून पसरतो याबाबत रिसर्च केला.
5 / 8
वैज्ञानिकांनी ACE -2 ला समजून घेण्यासाठी 10 मृत लोकांच्या डोळ्यांचा अभ्यास केला. या लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.
6 / 8
कोरोना व्हायरस डोळ्यातून पसरण्याबाबत अनेक रिपोर्ट समोर आल्यानंतर वैज्ञानिकांनी हा रिसर्च सुरू केला होता.
7 / 8
याआधी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले होते की, कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या डोळ्यातून अनेक आठवड्यांपर्यंत कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका कायम राहतो.
8 / 8
टेस्ट दरम्यान संक्रमणाच्या साधारण 21 दिवसांनंतरही एका महिलेच्या डोळ्यात व्हायरस आढळले होते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्य