मास्क वापरताना 'या' चुका केल्यानं वाढतो कोरोना संसर्गाचा धोका; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 04:48 PM2020-09-11T16:48:31+5:302020-09-11T17:08:50+5:30

कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. देशात दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कोरोना चाचण्या, क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टंसिंग याच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. दरम्यान मास्कच्या वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं काही गाईड लाईन्स दिल्या आहेत. कारण मास्कचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्या कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकत नाही.

मास्क सैल बांधू नका: मास्क सैल बांधल्यानं संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्क लावताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकलेलं असायला हवं. अनेकांना मास्क लूज बांधल्यामुळे संक्रमणाचा सामना करावा लागतो. म्हणून वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

नाकाच्या खाली मास्क असणं : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नाक तोंड व्यवस्थित झाकलेलं असायला हवं. अनेकदा लोक मास्क खाली करूनही रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी वावरताना दिसतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

मास्क खाली करून बोलणं : अनेकजण बोलताना मास्क काढून टाकतात. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. अनेक रिसर्चमधून दिसून आलं आहे की, बोलताना मास्क खाली केल्यास संक्रमण पसरण्याचा धोका दुप्प्टीनं वाढतो आणि बोलण्याचdया क्रियेतूनही संक्रमित व्यक्तीमार्फत संक्रमण पसरतं.

मास्कला सतत हात लावणं : अनेकांना प्रवासादरम्यान किंवा कुठेही बाहेर गेल्यानंतर मास्कला सतत हात लावण्याची सवय असते. ही सवय कोरोना संसर्गाचं कारण ठरू शकते. त्यामुळे शक्यतो एकदा मास्क लावल्यानंतर सतत हात लावू नका.

एकमेकांचा मास्क वापरू नका: घरातून बाहेर पडताना किंवा घरात एकमेकांचे मास्क वापरू नका. मास्कची आदलाबदल होणार नाही याची काळजी घ्या.

एकदा मास्क वापरल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्याच मास्कचा वापर करू नका. कापडाचा मास्क वापरत असाल तर तुम्ही धुवून त्याच मास्कचा वापर करू शकता. खबरदारी म्हणून आपल्यासोबत नेहमी दोन मास्क ठेवा. अर्धवट सुकलेला मास्क वापरू नका कारण त्यामुळे एलर्जी, खोकला, गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते.

सर्जिकल मास्क असल्यास वापरल्यानंतर फेकून द्या. लक्षणं असल्यावरच होम क्वारंटाईन करायला हवं असं नाही. चुकून एखाद्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं.

संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवायला हवेत. किंवा संक्रमित रुग्णानं स्वतःच साफसफाई करून खबरदारी बाळगल्यास उत्तम ठरेल.