WHO प्रमुखांनी दिल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' कारणामुळे भारताचं केलं कौतुक

By manali.bagul | Published: October 13, 2020 01:11 PM2020-10-13T13:11:26+5:302020-10-13T13:18:46+5:30

कोरोना व्हायरसचे रुग्ण जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाची लस विकसित करण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रियेसुस यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी लसीच्या भरवशावर राहण्याची काहीही गरज नाही. जी साधनं उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. समिती बैठकीदरम्यान त्यांनी याबाबत आपले मत मांडले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्स योजना आणि उपलब्ध साधनांच्या आधारे सुरक्षित आणि परिणामकारक लस तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, पण लसीवर विसंबून राहणं योग्य नाही. सध्या जी साधनं उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात आरोग्य व्यवस्था, समाज आणि अर्थव्यवस्था ही सध्याच्या काळात गुतांगुतीची झाली आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे म्हणून सावधान राहायला हवं. कारण आपल्यामुळे आसपास असलेल्या लोकांनाही धोका उद्भवू शकतो.

गर्दी टाळा- जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, मैदान, नाईट क्लब, धार्मिक स्थळांसह इतर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. कारण गर्दी जमा झाल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

आजारी लोकांची काळजी घ्या- घरातील वयस्कर लोक, तसचं आजारी व्यक्तीची विशेष काळजी घ्यायला हवी. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही आणि लोकांचा जीवसुद्धा वाचवता येईल.

आसपासच्या लोकांना माहिती द्या- स्वतःला आणि इतरांनाही संक्रमणापासून वाचवण्यासाठी कोरोनाबाबतची माहिती पटवून द्यायला हवी. याशिवाय सोशल डिस्टेसिंग, मास्कचा वापर याबाबत जनजागृती पसरवायला हवी.

सार्वजिक आरोग्यवर लक्ष : स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करता कोरोनाची लक्षणं असल्यास चाचणी करणं, स्वतःला क्वारंटाईन करणं तसंच संपर्कात आलेल्या लोकांना माहिती देऊन सावधगिरी बाळगायला सांगणं या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे.

घेब्रियेसुस यांनी सांगितले की, ''जे देश या गाईड लाईन्स चांगल्या पद्धतीने फॉलो करत आहेत. त्याच देशांना पुन्हा कोरोना पसरण्यापासून लॉकडाऊन करण्यापासून वाचता येऊ शकतं. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या चार दिवसात कोरोना संक्रमणाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.''

या आजारपासून बचावासाठी डिजिटल टेक्नोलॉजीची महत्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतातील आरोग्य सेतू अॅप्लिकेशनचे कौतुक केले. घेब्रियेसुस म्हणाले की, भारतात लाखो लोकांनी आरोग्य सेतू अॅप आपल्या फोनमध्ये घेतलं असून यामुळे आरोग्य विभागातील लोकांना कोरोना रुग्णांबाबत माहिती मिळवणं सोप जात आहे. तसंच चाचण्यामध्येही वाढ झाली आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सना कटेंटमेंट झोनबाबत सुचना मिळू शकते. तसंच कोरोना चाचणीचा रिपोर्टही या माध्यमातून पाहता येऊ शकतो. याशिवाय लक्षणं, उपचार, प्रतिबंध यांबाबत योग्य माहिती मिळवता येऊ शकते.