अभिमानास्पद! 'या' भारतीयामुळे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस लवकरच तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 12:50 PM2020-07-12T12:50:59+5:302020-07-12T13:13:22+5:30

कोरोनाच्या या लढाईत प्रत्येकालाच देशासाठी, देशवासियांसाठी आपण काहीतरी करावं असं वाटत असतं. याच भावनेतून राजस्थानातील जयपूर येथे जन्मलेल्या दीपक पालीवाल यांनी कोरोना लसीच्या ट्रायलसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे. पण कोणतीही लस ट्रायलसाठी येण्याआधी त्याचे मानवी परिक्षण होणं गरजेचं असतं.

दिपक सध्या लंडनमध्येच वास्व्यास आहेत. कोरोनाच्या माहामारीत लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी लंडनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत दिपकने मानवी चाचणीसाठी निवेदन दिले त्यानंतर मुलाखत दिली. अशा कठीण प्रसंगात अनेकजण मागे हटतात पण दिपक यांनी मानवी चाचणीसाठी जाण्याचा निश्चय केला. सुरुवातीला पत्नीला आणि कुटुंबियांना ही गोष्ट सांगितली तेव्हा प्रचंड विरोध करण्यात आला होता.

लसीच्या ट्रायलसाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील लोकांना एक हजार लोकांची आवश्यकता होती. यात अमेरिकन, भारतीय, आफ्रिकन अशा अनेक देशांतील लोकांचा समावेश असायला हवा असे निकष होते. जेणेकरून लस तयार झाल्यानंतर सर्वच देशात या लसीचे वितरण करता येईल.

दीपक यांनी सांगितले की, ''ज्या दिवशी मला चाचणीसाठी जायचे होते. त्याच दिवशी मला व्हाट्सएपद्वारे एक मॅसेज मिळाला की ट्रायल दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. ही गोष्ट माझ्या डोक्यात बराचवेळ ठाण मांडून बसली होती. ही बातमी खरी आहे की फेक याबाबत कळायला मार्ग नव्हता. पण निश्चिय केल्याप्रमाणे रुग्णालयात पोहोचलो. नंतर त्यांनी मला व्हिडीओ दाखवले आणि घटनेशी जोडलेले रिस्क फॅक्टर सुद्धा सांगितले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीत केमिकल कंपाऊंड सुद्धा होते.

८५ टक्के कंपाऊड मेनिंगजायटीस लसीशी मिळते जुळते असते. या मुळे आर्गन फेलियरचा धोका सुद्धा असतो. ताप, थंडीने शरीर कापणे अशा समस्या उद्भवू शकतात. पण या ट्रायलमध्ये समाविष्ट असलेल्या नर्सेसनी माझी हिम्मत वाढवली. ''

लस तयार करण्याचे अनेक टप्पे असतात. सगळ्यात शेवटी मानवी परिक्षण असते. यासाठी ज्या आजाराची लस तयार करायची आहे. त्या आजाराने संक्रमित न झालेल्या व्यक्तीची गरज असते. चाचणीसाठी १८ ते ५५ वयोगटातील निरोगी व्यक्तीची निवड केली जाते. महिला आणि पुरूष दोन्हींचा समावेश यात असतो.

अशी होती मानवी चाचणीची प्रक्रिया : दिपक यांनी दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी हातांवर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांना ताप आणि थंडी वाजण्याची समस्या उद्भवली. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सूज आली. पण हे खूप नॉमर्ल होते. याशिवाय त्यांना रोज एक तास रुग्णालयात घालवावा लागत होता. ई-डायरी भरावी लागत होती. त्यात शरीराचे तापमान, पल्स, बीपी, इंजेक्शनचे डाग याची नोंद व्हायची.

दिपक पालीवाल यांचे वय ४२ वर्ष आहे. तर एका फार्मा कंपनीत कंसल्टेंट म्हणून काम करत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतातील जयपूरमध्ये आहे. कुटुंबात दिपक सगळ्यात लहान आहेत. त्यांच्या या निर्णयाची घरी स्वागत करण्यात आले तर कुटुंबियांतील काही सदस्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं.

दिपक यांची पत्नी पर्ल डिसूजा त्यांच्या निर्णयाने जराही खूष नव्हत्या. परंतू दिपल यांचे लसीचे ट्रायल आता पूर्ण झाले आहे. दिपक आता ही लस पूर्णपणे यशस्वी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत