Coronavirus : भारतासाठी चिंतेची बाब? कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:16 PM2020-05-25T15:16:44+5:302020-05-25T15:46:53+5:30

रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये 50 वर्षापेक्षा कमी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 टक्के आहे जी इटली किंवा स्पेनमध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे.

कोरोना व्हायरसवर The Washington Post चा एक नुकताच करण्यात आलेला रिपोर्ट चिंताजनक आहे. या रिपोर्टनुसार, भारत आणि ब्राझीलसारख्या विकसनशील देशांमध्ये कोरोनाचे हॉट स्पॉट वाढतच आहे आणि ही महामारी या देशांमधील तरूणांना वेगाने आपली शिकार करत आहे. (Image Credit : wionews.com)

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ब्राझील आणि भारत यांसारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित होणारे आणि हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या वेगाने वाढत आहे. याआधी या महामारीचे केंद्र असलेल्या ठिकाणांवर तरूणांमध्ये संक्रमणाचा हा दर आढळून आला नव्हता. जेवढा आता या देशांमध्ये दिसत आहे. (Image Credit : newsbytesapp.com) (संपूर्ण रिपोर्ट या लिंकवर वाचा - https://www.washingtonpost.com/world/the_americas/coronavirus-brazil-killing-young-developing-world/2020/05/22/f76d83e8-99e9-11ea-ad79-eef7cd734641_story.html)

रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये 50 वर्षापेक्षा कमी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 टक्के आहे जी इटली किंवा स्पेनमध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे.(Image Credit : aljazeera.com)

मेक्सिकोमध्ये जवळपास एक चतुर्थांश मृतांचं वय 25 ते 49 वर्षे दरम्यानचं आहे. तेच भारत महामारीचा पुढील हॉटस्पॉट होण्याकडे वळत आहे. इथे या महिन्यात कोरोनाने मृत्यूमुखी पडणारे 50 टक्के लोक 60 पेक्षा कमी वयाचे आहेत.

रिपोर्टमध्ये विकसनशील देशांमध्ये तरूणांच्या होणाऱ्या मृत्यूंमागे खराब आरोग्य सेवा, अत्याधिक गरिबी आणि असमानता या गोष्टींना जबाबदार धरलं आहे. (Image Credit : dnaindia.com)

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये भारतातील मुंबई शहरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेससाठी जास्त लोकसंख्येला जबाबदार धरलं आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये हॉस्पिटल्सची खराब स्थिती आहे. इथे सोशल डिस्टंसिंग करणं अशक्य आहे. (Image Credit : livemint.com)

असं असलं तरी अधिकाऱ्यांनी महामारीच्या सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये घोषणा केली होती की, याचा सर्वात जास्त धोका वयोवृद्धांना आहे. पण गेल्या काही महिन्यांच्या रिपोर्टनुसार संक्रमण आणि जास्त गंभीर केसेस 20 ते 44 वयोगटातील आहेत. (Image Credit : weather.com)

The Washington Post च्या रिपोर्टमध्ये सामाजिक आणि आर्थिक कारणांचं विश्लेषण करून सांगण्यात आलं आहे की, कोणते लोक कोरोना व्हायरसपासून वाचण्याची जास्त शक्यता आहे.

मिशिगन, इलिनॉयस आणि उत्तर कॅरोनिलासारख्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या सुरूवातीच्या संख्येनंतर गेल्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती मिळाली होती की, आफ्रिकी-अमेरिकी कोरोना व्हायरसचे जास्त शिकार झाले आहेत. तज्ज्ञांचं मत आहे की, ही महामारी लोकांमध्ये समान रूपाने पसरत नाहीये.

अमेरिकेतील amfAR फाउंडेशनने अमेरिकेतील काही महामारी तज्ज्ञांना सोबत घेऊन हा रिसर्च केला होता. नुकत्याच करण्यात आलेल्या या रिसर्चबाबत CNN ने सांगितले की, महामारीच्या या विभिन्नते मागे लोकांपर्यंत आरोग्य सेवाची पोहोच, लहान घरे, बेरोजगारी, व्यापक भेदभाव आणि इतरही काही कारणे आहेत.