Omicron Variant : कोव्हॅक्सीन की कोविशील्ड; Omicron वर कोणती लस सर्वाधिक प्रभावी? एक्सपर्ट्सनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:49 PM2021-12-07T13:49:47+5:302021-12-07T13:56:02+5:30

देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटने (Omicron variant) देशात धोक्याची घंटा वाजविली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. मुंबईत दोन नवे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातीत ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहोचली आहे. तर सध्या देशभरात ओमायक्रॉनची लागण झालेले 23 रुग्ण आढळून आले आहेत.

देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.

यासंदर्भात डॉ. त्रेहान यांनी सांगितले की, या विषाणूचा संसर्ग सर्व जुन्या प्रकारांपेक्षाही वेगाने पसरू शकतो. दरम्यान, ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही, ते लोक स्वतः बरोबरच इतरांनाही धोक्यात आणू शकतात. याच बरोबर, ओमायक्रॉनविरोधात कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) पैकी कोणती लस प्रभावी आहे, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे.

यासंदर्भात, युनिव्हर्सल हॉस्पिटलचे डॉ. शैलेश जैन म्हणाले, ओमायक्रॉन व्हेरिअंट 50 नवीन म्यूटेशन घेऊन आला आहे. ज्यात 10 म्यूटेशन स्पाइक प्रोटीनमध्ये, जेथे रिसेप्टर आपल्या लंग्समध्ये जोडला जातो, तेथे येतो. कोव्हिशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (Covaxin) दोन्हींच्याही लसीकरणाने ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रभाव कमी होईल. डॉ. जैन यांच्या मते, कोव्हिशील्ड अथवा कोव्हॅक्सीन ओमायक्रॉन व्हेरिअंटविरोधात नक्कीच प्रभावी ठरेल. याच बरोबर, जैन यांनी ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या अलर्ट दरम्यान बूस्टर डोस लागू करण्याचाही आग्रह धरला आहे. त्यांनी 'आज तक'शी बोलताना ही माहिती दिली.

ओमायक्रॉनची लक्षण काय आहेत - आरोग्य तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आतापर्यंत आढळून अलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी कोणत्याही रुग्णात, कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. डेल्टा वेरिअंटप्रमाणे, ओमायक्रॉन व्हेरिअंटने संक्रमित झालेल्या रूग्णांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या, ऑक्सिजनची कमतरता किंवा शरीरात गंभीर संक्रमण पसरण्यासारख्या समस्या दिसून आलेल्या नाहीत.

सध्य ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य दिसत असली तरी, ती केव्हा घातक होतील हे सांगता येत नाही. जीनोम सिक्वेन्सिंगच्या अनेक अहवालांनंतरच याचा अंदाज लावता येऊ शकतो.

ओमायक्रॉनचा देशात प्रवेश झाल्यापासून सरकार सतर्क झाले आहे. ओमायक्रॉन प्रकारातील रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. असे म्हटले जाते की, फेब्रुवारीपर्यंत ओमायक्रॉन त्याच्या पिकवर असेल.

Read in English