शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाच्या 'ऑटोअँटीबॉडीज'नी वाढवली चिंता; व्हायरसऐवजी शरीरावर करताहेत हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 5:47 PM

1 / 8
कोरोनामुळे आजारी असलेल्या काही लोकांमध्ये अशी 'ऑटोअँटीबॉडीज' तयार होत आहेत, ज्या व्हायरसवर मात करण्याऐवजी शरीरावर हल्ला करत आहे.
2 / 8
एका नव्या संशोधनात हे समोर आले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, लॉन्ग कोविडमागे ऑटोअँटीबॉडीज देखील एक कारण असू शकते.
3 / 8
लाँग कोविड अशा परिस्थितीला म्हणतात की, ज्यावेळी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अनेक आठवड्यानंतरही लोकांच्या शरीरात विविध समस्या उद्भवतात.
4 / 8
नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोना संसर्गानंतर जीव वाचविणाऱ्या काही लोकांमध्ये हानिकारक रोगप्रतिकारक पेशी विकसित होतात.
5 / 8
जॉर्जियामधील इमोरी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या स्टडीत असे आढळले आहे की, हे ऑटोअँटीबॉडीज सारखे आहे. जसे की हेपेटाइटीसच्या प्रकरणांमध्ये ऑटोइम्यून रिस्पॉन्स असतात. त्यामुळे लाँग कोविड आजाराचे उपचार शोधणे कठीण होऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
6 / 8
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार लाँग कोविडशी झुंज देणाऱ्या लोकांची नेमकी संख्या शोधणे कठीण आहे, परंतु अशा रुग्णांच्या आकडेवारीत सतत वाढ होत आहे.
7 / 8
अनेक कोरोना रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे जाहीर झाल्यानंतर कित्येक महिन्यांपर्यंत त्यांना स्वत: ला अशक्त आणि थकल्यासारखे वाटते.
8 / 8
ब्रिटनमध्ये केलेल्या एका स्टडीत असे आढळून आहे की, रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ११० रुग्णांपैकी ८१ (७४ टक्के) रुग्ण डिस्चार्जच्या तीन महिन्यांनंतरही विविध प्रकारच्या समस्येने पीडित होते. लाँग कोविडच्या बळींमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य