शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus: कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यास काय होतं नुकसान? 'या' रुग्णांचा होतो मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:49 PM

1 / 11
चीनमधून सुरुवात झालेल्या भयंकर कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ६५०० लोकांचा जीव घेतला आहे. १ लाख ५० हजारांहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये ३५०० हजार तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
2 / 11
आतापर्यंत देशात ११२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरतो.
3 / 11
या व्यतिरिक्त, खुल्या हवेत खोकला आणि शिंकणे, हात झटकणे किंवा मिठी मारणे, एखाद्या संक्रमित वस्तूला स्पर्श करणे, तोंड किंवा डोळ्यांना हात लावण्यानेही कोरोना पसरतो.
4 / 11
एका अहवालानुसार, कोरोना विषाणू खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे हवेत पसरलेल्या सुक्ष्म कणात पसरतो. नाक, तोंड आणि डोळ्याद्वारे प्रभावित व्यक्तीकडून जवळच्या लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकतो.
5 / 11
विषाणूचे कण नाकाद्वारे गळ्यापर्यंत पोहचतात आणि पेशींमधील विशिष्ट रिसेप्टरला जोडतात. कोरोनाचे हे कण पेशी कमकुवत करतात तसेच त्यांच्या कार्यावर परिणाम करतात.
6 / 11
जसे व्हायरसचे कण वाढू लागतात ते बाहेर येऊन घशातील पेशी संक्रमित करतात. यामुळे बहुतेकदा घसा खवखवणे आणि घशात कोरडा खोकला होतो. हे कण घशात ब्रोन्कियल नलिका म्हणजे श्वसन नलिकेवर परिणाम करण्यास सुरुवात करते.
7 / 11
जेव्हा व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांच्या त्वचेला जळजळ होते. यामुळे एल्वेओली किंवा फुफ्फुसांच्या थैलीचे नुकसान होऊ शकते.
8 / 11
एवढेच नव्हे तर, शरीरात फिरणार्‍या रक्तास ऑक्सिजन पुरवण्यासाठी आणि रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकण्यासाठी हे फुफ्फुसांना अडथळा आणते. जर येथे सूज येत असेल तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करणे अधिक कठीण ठरते.
9 / 11
फुफ्फुसांची जळजळ आणि ऑक्सिजनच्या प्रवाहात बिघाड यामुळे फुफ्फुसांचा आजार न्यूमोनिया होतो.
10 / 11
काही लोकांना श्वास घेण्यास इतका त्रास होतो की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज भासते. सर्वात गंभीर प्रकरणात हे तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम म्हणून ओळखले जाते.
11 / 11
यात, फुफ्फुसांमध्ये इतका द्रव तयार होतो की त्यामुळे रुग्णाला श्वास घेता नाही आणि त्या रुग्णाचा मृत्यू होतो. मात्र ज्यांची रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे अशा लोकांचा मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. भारतात कोरोना आजारातून बरे झालेले अनेकजण दिसून येतात.
टॅग्स :corona virusकोरोना