शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

corona virus : म्हणून स्पेनमधील कोरोना वॉरियर्स घेताहेत गाढवांची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 4:33 PM

1 / 6
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या या साथीमुळे रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत चालले आहेत. तसेच या कारणाने अनेक वैद्यकीय कर्मचारी डिप्रेशनची शिकार होत आहेत.
2 / 6
आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची औदासिन्य आणि तणावामधून सुटका करण्यासाठी स्पेनमध्ये गाढवांची मदत घेतली जात आहे. स्पेनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तणावमुक्तीसाठी ही उपचार पद्धती मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.
3 / 6
ही उपचार पद्धती पशु-सहायता उपचार सुविधेच्या नावाने ओळखली जाते. या उपचार पद्धतीमध्ये मानसिक दृष्ट्या त्रस्त असलेल्या व्यक्ती गाढवांची गळाभेट घेतात. ज्यामुळे त्यांना काहीसे रिलॅक्स वाटते.
4 / 6
द हॅप्पी लिटिल डाँकी ची सेवा देणाऱ्या एल बुरितो फेलिज हे ही सेवा पुरवतात. त्यांची २३ गाढवांचा समावेश असलेली एक संस्था आहे. त्यांनी अल्झायमरचे रुग्ण आणि असा त्रास जाणवणाऱ्या मुलांसोबत काम केले आहे. तसेच या पद्धतीची सुविधा घोड्यंसहसुद्धा उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मते गाढव आपला सौम्य स्वभाव आणि इतर गुणवैशिष्ट्यांमुळे मानसिक आणि भावनात्मक विराकांना दूर ठेवण्यासाठी मदतीसाठी अनुकूल असतात.
5 / 6
रुग्णालयात काम करणारे २५ वर्षीय मॉर्लेस सांगतात की, परिस्थिती आधीच्या तुलनेत खूप वाईट आहे. जे आम्ही आधीच केले होते. ते परत एकदा होत आहे. ते आपल्या देशातील अन्य भागात काम करत आहेत. कारण स्पेन कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यांनी सांगितले की सातत्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि अधिकाधिक आजारी रुग्णांमुळे डॉक्टरांनाही तणावाचा सामना करावा लागत आहे. या गाढवांसोबत राहिल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमधील वाढता तणाव कमी करण्यात वास्तव मदत मिळत आहे.
6 / 6
या योजनेची सुरुवात जून महिन्याच्या अखेरीस झाली होती. एका विषाणूशी झुंजत असलेल्या लोकांना दिलासा देण्याची एक पद्धत म्हणून तिची सुरुवात करण्यात आली होती. स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३३ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय