अरे व्वा! कोरोना लसीचा चमत्कार; कोरोनापासून बचावासह इतरही आजार झाले दूर, महिलेनं सांगितला अनुभव...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 01:03 PM2021-03-01T13:03:06+5:302021-03-01T13:21:34+5:30

Corona vaccine is doing wonders to some people : ही लस फक्त कोरोना व्हायरसलाच नाही तर इतर आजारांनाही नियंत्रणात ठेवण्यासाठी परिणामकारक ठरत आहे.

कोरोना व्हायरसची लस घेतल्यानंतर फक्त या जीवघेण्या व्हायरसबाबत लोकांची चिंता कमी झाली, असं नाही तर लसीच्या उपलब्धतेनं जगभरातील लोकांना इतर आजारांशी लढण्यासाठी हिंमत दिली आहे. ही लस फक्त कोरोना व्हायरसलाच नाही तर इतर आजारांनाही नियंत्रणात ठेवण्यासाठी परिणामकारक ठरत आहे.

इंग्लँडची रहिवासी असलेली ७२ वर्षीय महिला जोआन मागच्या सहा महिन्यांपासून व्यवस्थित चालू शकत नव्हती. या महिलेचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर या महिलेला इंन्फेक्शनचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या महिलेच्या पायांना खूप वेदना व्हायच्या. दरम्यान एक्स्ट्राजेनका लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या महिलेच्या पायांची समस्या पूर्णपणे कमी झाली.

त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ शकतील अशी आशा जोआन यांना आहे. जोआना आता कामावर पुन्हा परत जाऊ शकतात. कोरोनाची लस घेतल्यानंतर जोआना यांना खूप बरं वाटत आहे. एका दुर्मिळ आजाराचा सामना करत असलेल्या माणसालाही कोरोनाची लस घेतल्यानंतर काही दिवसांनी सकारात्मक बदल दिसून आला आहे.

एका माणसानं सांगितले की, त्याला खाजेची समस्या होती आणि कोरोनाची लस घेतल्यानंतर काही तासांनी हात, पायांवरील खाज, खुजलीची व्रण कायमचे नष्ट झाले. लस घेतल्यानंतर ४ दिवसांनी ही समस्या पूर्णपणे बरी झाली होती.

याशिवाय एका महिलेनं सांगितले की, ''कोरोनाची लस घेतल्यानंतर माझ्या पतीला १५ वर्षांनी चांगली झोप आली. माझ्या पतीला १५ वर्षांपासून स्लिप डिर्सॉर्डरचा सामना करावा लागत होता. कोरोनाची लस घेतल्यानंतर या समस्येवर आराम मिळाल्याप्रमाणे वाटले. ''

असं पहिल्यांदा झालेलं नाही. आतापर्यंत अनेकांना लस घेतल्यानंतर आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत मिळाली आहे. याआधीही १९७०च्या दशकात वैज्ञानिकांना दिसून आले होते की, लोकांनी पोलिओची लस दिल्यामुळे मृतांचे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळाले.

याव्यतिरिक्त ७० आणि ८० दशकात डॅनिश वैज्ञानिक पीटर यांनी सांगितले होते की, पश्चिम आफ्रिकेत कांजिण्यांची लस दिल्यानंतर या समुदायाचा जन्मदर वाढला होता आणि मृत्यूदरात कमतरता पाहायला मिळाली.

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरच्या इम्यूनोलॉजिस्ट प्राध्यापक शीना क्रोएकशँक यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. शीना यांनी सांगितले की, ''लसीमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्याची करण म्हणजे कांजिण्या, टीबी, यांसारख्या आजारांमुळे या लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीला नुकसान पोहोचलं होतं. लस घेतल्यानंतर या लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीत सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळत आहे. ''