शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:09 PM

1 / 10
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांनी दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यानएका चीनी बसमध्ये कोरोना व्हायरसचा हवेतून होणारा प्रसार याबाबत संशोधन करण्यात आलं होतं. या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चमध्ये कोविड १९ मुळे होणारा प्रसारा याबाबत माहिती मिळवता आली आहे. या बसमध्ये फक्त एक व्यक्ती कोरोना संक्रमित होती.
2 / 10
एका व्यक्तीमुळे आजूबाजूच्या सर्व लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. हा रिसर्च मंगळवारी प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चमधून कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
3 / 10
दोन मीटरच्या अंतरापर्यंत कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ शकते. थेट संपर्कात नसलेल्या कोरोनाबाधितांमुळेही संक्रमण होऊ शकतं हे या रिसर्चमधून दिसून आलं. या माहामारीच्या सुरूवातीच्या काळात आरोग्य अधिकारी यांना हा व्हायरल हवेतून पसरू शकतो याबाबत विश्वास नव्हता.
4 / 10
म्हणजेच हा व्हायरस हवेच्या माध्यमातून संक्रमित थेंबांद्वारे प्रसारित करतो. असं तज्ज्ञांचं मत होतं. पण आता जसंजसं हवेतून होत असलेल्या प्रसाराबाबत पुरावे समोर येत आहेत. तसतसं वैज्ञांनिकांना आपली भूमिका बदलावी लागत आहे.
5 / 10
अमेरिकी मेडिकल जर्नल JAMA इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार एका समारंभात संम्मेलन झाल्यानंतर प्रवासी बसने जात होते. या प्रवाश्यांना फक्त ५० मिनिटांचा प्रवास करायचा होता. सार्वजनिक स्थळांवर मास्कचा वापर अनिवार्य करण्याआधीची ही घटना आहे.
6 / 10
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ च्या एका रुग्णामुळे संपूर्ण बसमध्ये व्हायरल पोहोचला. त्यावेळी कोरोना विषाणू पसर.ण्याची सुरूवात होती
7 / 10
चीनमधील वुहानमध्ये हा व्हायरस झपाट्यानं पसरल्यानं २०१९ मध्ये व्हायरसं पहिल्यांदाच आपला प्रकोप दाखवला होता. वैज्ञानिकांनी या घटनेची तपासणी केल्यानंतर समोर आले की, बसमध्ये बसलेले ६८ पैकी २३ लोक संक्रमित होते.
8 / 10
संक्रमितांपासून १ किंवा २ मीटरच्या अंतरावर असलेल्यांना व्हायरसनं संक्रमित केलं होतं. दूर बसलेल्या लोकांना तुलनेनं संक्रमणाचा शिकार व्हावं लागलं नाही
9 / 10
याव्यतिरिक्त ज्या प्रवाश्यांमध्ये संक्रमण झालं होतं. त्यांना कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. वातावरणातील हवेमुळे म्हणजेच बसमधील हवेतून संक्रमण झालं असावं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
10 / 10
संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 38,53,407 वर गेला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यchinaचीनResearchसंशोधनInternationalआंतरराष्ट्रीय