मोठा दिलासा! भारतासह अमेरिकेतही कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:45 PM2020-07-09T15:45:28+5:302020-07-09T16:03:37+5:30

दिवसेंदिवस जगभरातसह भारतातही कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आटोक्यात आणण्याासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिका आणि भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी सांगितले की भारत आणि अमेरिकेत आयुर्वेदिक डॉक्टर आणि तज्ज्ञ कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी औषधांचे क्लिनिकल परिक्षण सुरू करत आहेत.

भारत आणि अमेरिकेतील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समुहाने डिजिटल संवादाच्या माध्यामातून सांगितले की, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दोन्ही देशातील तज्ज्ञ पुढाकार घेऊन औषधांचे परिक्षण सुरू करणार आहेत.

त्यांनी सांगितले की, आमच्या संस्थानात शोध, शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्रमातून आयुर्वेदाचा प्रसार केला जात आहे.

तसंच दोन्ही देशातील तज्ज्ञ आणि डॉक्टर कोविड १९ या आजाराशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी क्लिनिकल परिक्षण सुरू करण्याची योजना तयार करत आहेत अनुसंधान संसाधनांमध्ये तज्ज्ञांची देवाण घेवाण सुरू आहे.

संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील औषधांच्या कंपन्या किफायतशीर औषध आणि लस तयार करण्यात अग्रेसर आहे. आता कोरोनाच्या माहामारीविरुद्ध लढण्यासाठीसुद्धा भारत तयार आहे.

अमेरिकेतील संस्थानं आणि भारतातील औषधांच्या कंपन्यामध्ये कमीतकमी तीनप्रकारे भागीदारी सुरू आहे. औषध निर्मीत झाल्यानंतर फक्त भारत आणि अमेरीकेलाच नाही तर संपूर्ण जगातील लोकांना कोरोनापासून बचावासाठी फायदा मिळू शकतो.

Read in English