कोरोनाची लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांमार्फत संक्रमणाचा धोका ५० टक्के कमी; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:52 AM2020-05-25T09:52:46+5:302020-05-25T10:01:40+5:30

कोरोनाची माहामारी दिवसेंदिवस जगभरात वेगाने पसरताना दिसून येत आहे. कोरोना बाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर उपचारांसाठी कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध न झाल्यामुळे गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णाच्या उपचारांसाठी केला जात आहे. लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण अनेक देशात आढळून येत आहेत.

याविषयी सीडीसीने एक दावा केला आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार लक्षणं दिसत असलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये संक्रमणाचा धोका कमी असतो. चला तर मग जाणून घेऊया सीडीसीने काय सांगितले आहे.

SARS-CoV-2 ची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं दिसत नसलेले लोक जास्त सुरक्षित आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार अनेक देशांमध्ये केलेल्या संशोधनानंतर त्यांना हा निष्कर्ष काढला आहे. या संशोधनातून दिसून आलं की, ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचं संक्रमण पसरण्याचा धोका कमी असतो.

लक्षणं दिसत नसलेल्या संक्रमित व्यक्तीकडून संक्रमण पसरण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. ५० टक्के संक्रमण न पसरण्याची स्थिती सुरक्षित समजली जाते. त्याचप्रमाणे ५० टक्के धोक्याची स्थिती असते. कारण संक्रमण दिसत नसलेल्या व्यक्तीकडून योग्यवेळी तपासणी केली गेली नाही तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सीडीसीद्वारे दिलेली माहिती ही सकारात्मक ठरू शकते. कारण त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका भारतात कमी होऊ शकतो. आरोग्य मंत्राालयाने दिलेल्या माहितीनुसार ६९ टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. सध्या हा विषाणू एका व्यक्तीपासून इतरांपर्यंत पोहोचत असताना त्याचा धोका किती प्रमाणात कमी होतो. याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंच्या लसीसाठी ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. काही लसींचे ट्रायल शेवटच्या टप्प्यात आहेत. भारतातील कंपनी बायोटेक ने थॉमस जेफरसन यूनिव्हरसिटीच ऑफ फिलाडेल्फिया सोबत लसीवर काम करणं सुरू केलं आहे. लस तयार होईपर्यंत बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण ही खूप मोठी प्रक्रिया आहे.

Read in English