कमी वयातच पांढरे झालेत दाढी-मिशीचे केस? हे घरगुती उपाय करा, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:32 AM2024-04-04T10:32:59+5:302024-04-04T11:04:49+5:30

White beard treatment: बऱ्याच लोकांच्या दाढीचे आणि मिशांचे केसही पांढरे होतात. अशात दाढीचे पांढरे केस काळे करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

White beard treatment: आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळत नाहीत. अशात कमी वयात वेगवेगळे आजार होण्यासोबत केसही पांढरे होऊ लागतात. बऱ्याच लोकांच्या दाढीचे आणि मिशांचे केसही पांढरे होतात. अशात दाढीचे पांढरे केस काळे करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

केस पांढरे होण्याची कारणे - वय जसजसं वाढत जातं किंवा पोषक तत्व मिळतात तेव्हा शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होतं. त्याच कारणाने मिशा आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो. त्यासोबतच तणाव, चुकीचं खाणं-पिणं, आजारी असणे आणि वृद्धापकाळ यानेही केस पांढरे होतात.

1) आवळ्याचं पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन उकडून घ्या. हे तेल थंड करुन रोज दाढीच्या केसांची मालिश करा. यानेही पांढरे केस दूर होतील.

2) एक ग्लास पाण्यात कढीपत्ता टाकून ते पाणी उकडून घ्यावे. हे पाणी रोज प्यायल्यास मिशी आणि दाढीचे केस लवकर पांढरे होणार नाहीत.

3) गायीचं तूपही दाढीचे केस काळे ठेवण्यात मदत करतं. गायीच्या तूपाने रोज दाढीच्या केसांची मासिश केल्यास केसांचा काळा रंग कायम राहतो.

4) अर्धा कप पाण्यात दोन चमचे साखर घाला. यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिश्रित करुन हे मिश्रण दाढीच्या केसांना लावा. याने केस काळे राहतील.

5) अर्धा वाटी पपई बारीक करुन त्यात चिमुटभर हळद आणि एक चमचा कोरफडीच्या रस मिश्रित करा. हे मिश्रण दाढीच्या केसांवर लावल्यास केसांचा पांढरा रंग जाऊ शकतो.

6) कढीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल रोज दाढी आणि मिशीच्या केसांवर लावल्यास केस काळे राहतील.

7) दोन चमचे कांद्याच्या रसात पुदीन्याची पाने मिश्रित करु दाढी आणि मिशीच्या केसांवर लावा. यानेही केस काळे राहण्यास मदत होईल.