शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाकाहाराचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्, घासपूस म्हणत नाक मुरडणं कायमचं बंद कराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 4:40 PM

1 / 10
अनेक संशोधनांतून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की आपल्या आहारातील भाज्यांमुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. शाकाहारात फायबर आणि अॅंटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यानं ते आपल्याला फायदेशीर ठरतं.
2 / 10
त्याचबरोबर आपल्याला शाकाहारातून पोटॅशियम, मॅग्नीशियम फोलेट, आयरन आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई (Vitamin A, C and E) सारखे पोषकतत्वं मिळतात.
3 / 10
वजन कमी करायचं असेल (Obesity)तर आपल्यासाठी शाकाहार हा उत्तम पर्याय आहे. कारण मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहार करणाऱ्यांमध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI index) कमी असतो.
4 / 10
त्याचबरोबर शाकाहारामुळं शरीराला योग्य प्रमाणात कॅलरीज मिळतात. त्यामुळं आपल्याला लठ्ठपणाचा धोका टाळता येतो.
5 / 10
शाकाहारामुळे आपल्या शरीरातील रक्तदाबाचीही समस्या कमी होऊ शकते. बीपीने ग्रस्त असणाऱ्यांनाही शाकाहाराचा फायदा होऊ शकतो.
6 / 10
भाज्या-फळांमुळे आपल्या शरीरातील किडनी फंक्शनमध्ये सुधारणा होत असते.
7 / 10
शाकाहारामुळे कॅन्सरपासूनही बचाव करता येतो कारण शाकाहारी व्यक्तींच्या शरीरात कोलोरेक्टल कॅन्सरचा (colon cancer) धोका कमी होत असतो.
8 / 10
ताजी फळं आणि पालेभाज्यांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शाकाहारामुळे आपल्याला हार्ट अटॅकचाही धोका कमी होत असतो. एका संशोधनानुसार शाकाहाराचे सेवन करणाऱ्या ७५ टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका कमी होत असतो.
9 / 10
शाकाहारी पदार्थांमधील दूध, लोणी, चीझ, शेंगदाणे, सोयाबीन, पालेभाज्या, पनीर, टोफू यांच्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला मोठी मदत मिळते.
10 / 10
तुम्हाला शाकाहारामध्येच मांसाहारासारखी चव अनुभवण्यास मिळाली तर? यासाठी मशरूम आणि फणसाची भाजी खाऊन पाहा. या भाज्यांना मांसाहाराप्रमाणे चव येते, असं म्हणतात. पोषण तत्त्वांचा साठा असलेल्या या दोन्ही भाज्या चविष्टही आहेत.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या