फक्त कॉफी न पिता दालचीनीयुक्त कॉफी प्याल, तर एक नाही अनेक फायदे मिळवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 17:33 IST2020-02-19T17:20:41+5:302020-02-19T17:33:17+5:30

शरीर चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचा घ्यायचा कि नाही असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. पण रोज सवय असल्यामुळे आपल्याला जास्त सवय झालेली असते. आज आम्ही तुम्हाला कॉफीचे सेवन केल्यानंतर तुम्हाला कसा फायदा होईल याबद्दल सांगणार आहोत.

नॉर्मल कॉफी पिण्यापेक्षा तर तुम्ही दालचिनी कॉफीत टाकून प्यायल्यात तर त्यामुळे फक्त तुमच्या कॉफीला फ्लेव्हरच येणार नाही तर शरीर सुद्धा चांगलं राहील.

कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्यास पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक शांत होते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर दालचीनी घालून प्यायलेली कॉफी उत्तम ठरेल.

कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्यास अँटिऑक्सिडंटची मात्रा वाढते आणि तुमची त्वचा नितळ आणि चमकदार दिसते. त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

कॉफीत दालचिनी टाकून प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल योग्य राहतं. तसंच उत्साह येतो.

दालचिनीमध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल घटक असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. तसंच दालचिनीत अँटिइन्फ्लेमेटरी घटकही असतात, जे फ्लूमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम देतात.
















