Disease X: वैज्ञानिकांनी दिला घातक व्हायरसचा इशारा, जाऊ शकतो ७ कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:19 AM2021-03-12T11:19:05+5:302021-03-12T11:29:39+5:30

Disease X : WHO ने अंदाज व्यक्त केला आहे की, दरवर्षी या आजाराचे जवळपास एक अब्ज केसेस समोर येऊ शकतात. आणि लाखो लोकांचा यात मृत्यू होऊ शकतो.

कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) दरम्यान वैज्ञानिकांनी एका नव्या घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. हा व्हायरस मनुष्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो आणि कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने पसरू शकतो.

या व्हायरसचं नाव आहे डिजीज एक्स (Disease X). वैज्ञानिकांचं मत आहे की, हा आजार इबोला व्हायरससारखा घातक ठरू शकतो.

WHO ने अंदाज व्यक्त केला आहे की, दरवर्षी या आजाराचे जवळपास एक अब्ज केसेस समोर येऊ शकतात. आणि लाखो लोकांचा यात मृत्यू होऊ शकतो.

हेल्महोल्टज् सेंटरचे डॉक्टर जोसेफ सेटल यांनी द सन ऑनलाइनला सांगितले की, 'जनावरांची कोणतीही प्रजाती या आजाराचा स्त्रोत असू शकते.

जिथे उंदीर आणि वटवाघळं जास्त असतात तिथे याची जास्त शक्यता आहे. ते म्हणाले की, हा आजार प्रजातीच्या अनुकूलन क्षमतेवर निर्भर करते'.

सध्या या आजाराबाबत फार जास्त माहिती समजू शकली नाही. पण वैज्ञानिकांचं मत आहे की, हा अज्ञात आजार पुढील महामारी ठरू शकतो. याचा एक रूग्ण कांगोमध्ये आढळून आला होता.

कांगोत आढळून आलेल्या रूग्णाला ताप आणि सोबतच इंटरनल ब्लीडिंग होत होती त्याने इबोलाची टेस्ट केली होती. जी निगेटिव्ह आली होती.

वैज्ञानिकांना भीती आहे की, पुढील महामारी ब्लॅक डेथपेक्षाही घातक असू शकते. ज्यात ७.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. आणि डिजीज एक्स व्हायरस यापेक्षा जास्त घातक ठरू शकतो.

इतकेच नाही तर मानवजातीला येणाऱ्या काळात दर पाच वर्षांनी आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो. EcoHealth Alliance नुसार, जगात असलेल्या १.६७ मिलियन अज्ञात व्हायरसपैकी ८२७००० प्राण्यांमधून मनुष्यात आले आहेत.

कोविड- १९ याचं उदाहरण आहे की, कशाप्रकारे प्राण्यांमधून मनुष्यांमद्ये पोहोचला आणि कशाप्रकारे मानवाला याचा फटका बसला.

बर्ड फ्लू, SARS, MERS, Nipah आणि यलो फीवर सगळीच व्हायरसची सामान्य उदाहरणे आहेत. जे आधी प्राण्यांमध्ये उत्पन्न झाले होते आणि नंतर मनुष्यात पोहोचले.