सावधान! कोणती फळं एकत्र खाल्ल्यानं तयार होतं विष, चुकूनही करू नका याकडे दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:56 PM2022-07-01T15:56:00+5:302022-07-01T16:06:19+5:30

Fruit Combinations : समस्या ही आहे की, बऱ्याच लोकांना फळं खाण्याची वेळ आणि पद्धत माहीत नसते. कोणतेही पदार्थ खाण्या-पिण्याचे काही नियम असतात.

फळं खाणं सर्वात फायदेशीर आणि आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. कारण त्यांच्यात आरोग्यासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबरपासून ते फ्लेवोनोइडसहीत सर्व प्रकारचे अॅंटी-ऑक्सिडेंट्स या फळांमध्ये असतात. रोज फळं खाल्ल्याने हृदयरोग, कॅन्सर, सूज आणि डायबिटीससारख्या अनेक समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. आजारांसोबत लढण्यासाठी आंबट फळ आणि बेरीज शक्तीशाली मानले जातात.

पण समस्या ही आहे की, बऱ्याच लोकांना फळं खाण्याची वेळ आणि पद्धत माहीत नसते. कोणतेही पदार्थ खाण्या-पिण्याचे काही नियम असतात. असं सांगितलं जातं की, फळांमधून भरपूर पोषण मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, तुम्ही कोणत्या फळासोबत कोणतं फळ किंवा कोणत्या पदार्थासोबत कोणतं फळ खात आहात. उदाहरणार्थ जेवण किंवा पाण्यासोबत कोणत्याच फळाचं सेवन करू नये.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, फळं रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थासोबत खाल्लीत तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. हे अजब वाटत असलं तरी सत्य आहे. काही पदार्थ ताज्या फळांसोबत मिक्स करणं किंवा खाणं विषाक्त होऊ शकतं. आणि याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. न्यूट्रिशनिस्ट अॅन्ड डायटिशिअन शिखा अग्रवाल वर्मा यांनी सांगितलं की, कोणते फळं कोणत्या पदार्थासोबत खाऊ नयेत.

फळं विषारी कसे होतात? - आरोग्य चांगलं राहण्यासाठी अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. फळांमध्ये यांचं प्रमाण अधिक असतं. पण अनेकदा जेवण करताना फळं खाणं किंवा फळांसोबत इतर काही पदार्थ खाणं खतरनाक ठरू शकतं. अनेकदा चुकीचं कॉम्बिनेशन विषारी ठरू शकतं. याने तुम्हाला अॅलर्जी, चट्टे आणि इतकंच काय तर फूड पॉयजनिंग होऊ शकतं.

पपई आणि लिंबू - पपईवर लिंबू पिळून खाणं धोकादायक ठरू शकतं. तुमच्या सलादमध्ये कधीही या दोन गोष्टी एकत्र करू नका. कारण हे कॉम्बिनेशन विषारी होऊ शकतं. असं मानलं जातं की, पपईसोबत लिंबू मिक्स केल्याने हीमोग्लोबिन कमी होतं आणि रक्तही असंतुलित होतं. जे नुकसानकारक ठरू शकतं.

पेरू आणि केळी - तुम्हाला फ्रूट चाट आवडतं का? तुम्ही पाहिलं असेल की, फ्रूट चाटमध्ये पेरू आणि केळी मिक्स करणं कॉमन आहे. पण हे फळांचं हे कॉम्बिनेशन आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण करू शकतं. हे दोन फळं एकत्र खाल्ल्याने मळमळ, सूज, डोकेदुखी आणि अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतं.

अननस आणि दूध - अननसाची टेस्ट मस्त असते आणि यासोबत दूध मिक्स करून अनेक पदार्थही तयार केले जातात. पण या कॉम्बिनेशनने लोकांना मळमळ, पोटदुखी आणि सूजसारख्या समस्या होऊ शकतात. याचं कारण अननसात ब्रोमेलॅन नावाचं एक तत्व असतं, जे दुधासोबत रिअॅक्शन करतं आणि यामुळे संवेदनशील लोकांमध्ये याच्या समस्या दिसू लागतात.

पाण्यासोबत कलिंगड - तुम्ही कलिंगडाची स्मूदी पित असाल किंवा इतर फळांसोबत मिक्स करत असाल किंवा एक वाटी कलिंगड खाल्ल्यावर पाणी पित असाल तर तुम्ही चुकताय. या फळासोबत कोणतेही पदार्थ मिक्स केले किंवा पाणी मिस्क केलं तर पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. असं केल्याने पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. पचनक्रिया हळुवार होते, सूज आणि अॅसिटिडीही होऊ शकते.