सावधान! रोजच्या वापरातील 'या' ६ वस्तूंमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 11:29 AM2020-10-23T11:29:03+5:302020-10-23T13:48:23+5:30

घरी असो किंवा बाहेर कोणत्याही ठिकाणी आपण कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित नसतो. नवीन अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस एका ठिकाणाहून इतर ठिकाणी संसर्ग पसरवतो. याबाबत ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या ६ वस्तूंपासून कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो असं या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.

सार्वजनिक वाहतूकीतील खिडक्या- बस, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतुकसेवा अनलॉकमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. या अभ्यासात सार्वजनिक वाहनांच्या खिडक्या संक्रामक असल्याचे सांगण्यात आले आहे. खिडक्या किंवा खांब हे काचेपासून तयार होतात. काचेवर व्हायरस सहज दीर्घकाळ चिकटून राहून शकतो. चढता उतरताना किंवा प्रवासादरम्यान प्रवासी या भागांच्या संपर्कात येतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. म्हणून सार्वजनिक वाहनांचा वापर करताना इतरत्र स्पर्श करू नका. शक्य असल्यास ग्लोव्हजचा वापर करा.

नोटा- एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस २० डिग्री तापमानात जवळपास २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो. नोटेची देवाण घेवाण करत असताना संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून जास्तीत जास्त ऑनलाईन पैश्यांचे व्यवहार करण्याची सवय लावून घ्या.

फोनची स्क्रिन - फोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. अनेकजण वॉशरूमध्येही मोबाईल घेऊन जातात. अशावेळी कोरोनासारखे असंख्य व्हायरस मोबाईलच्या काचेला चिकटण्याचा धोका असतो. म्हणून वेळोवेळी आपला फोन सॅनिटाईज करत राहायला हवं.

रुग्णालयातील वेटिंग रुम- रुग्णालयातल साफ सफाईकडे विशेष लक्ष दिलं जात. पण अनेक ठिकाणी वेटींग रुममध्ये संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. वेटींग रूममध्ये अनेकांची ये-जा असते. त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. म्हणून कारण नसताना रुग्णालयात जाणं टाळा. गेल्यास मास्क, सॅनिटायजर, फेसशिल्ड, ग्लोव्हजचा वापर करा.

ATM- एटीएमचे बटन, काच यांवर किटाणू सहज चिकटतात. त्यामुळे एटीएमचा वापर टाळून तुम्ही असल्यास तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकता. एटीएमचा वापर केला तर लगेचच आपले हात सॅनिटाईज करून घ्या.

घरात कोरोनापासून कसा बचाव कराल- आपल्या घराची साफ सफाई व्यवस्थित करा. सगळ्या भागांना सॅनिटाईज करून घ्या. बाहेरून आल्यानंतर अंघोळ करा, मास्क, कपडे स्वच्छ करून घ्या.

स्टेनलेस स्टील- एका अभ्यासानुसार जास्त तापमानात कोरोना व्हायरस टिकू शकत नाही. स्टेनलेस स्टीलवर हा व्हायरस दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. म्हणून आपल्या किचनमधील स्टीलची भांडी वेळोवेळी स्वच्छ करत राहा.

Read in English