दररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 22:09 IST2019-01-21T22:04:45+5:302019-01-21T22:09:29+5:30

इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही.
अमेरिकन सायकोलॅाजिकल असोसिएशनने केलेल्या एका प्रयोगावरुन असे समोर आले की सकाळच्या वेळी चालल्याने दिवसभर लोकांचा मूड फ्रेश राहतो.
दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते.
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असे संशोधनातून समोर आले आहे.