गोव्यात बहरले वर्षा पर्यटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 21:02 IST2018-06-27T20:58:18+5:302018-06-27T21:02:53+5:30

पावसाळ्याच्या सुरुवातीबरोबरच गोव्यामध्ये वर्षापर्यटन बहरले आहे. डोंगररांगातील धबधब्यांच्या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकंची गर्दी होत आहे. (सर्व छायाचित्रे: गणेश शेटकर)
उत्तर गोव्यातील साखळी येथील हरवळे धबधबा. बारा महिने सुरु असणारा हा धबधबा यंदा खूप वर्षानी प्रथमच कोरडा पडलेला होता. तो पुन्हा कोसळू लागला आहे. येथे परदेशी पर्यटकही हमखास भेट देतात.
सुर्ला ( उत्तर गोवा जिल्हा) येथे लाडक्याचा धबधबा असे नाव असणारा परिसर पर्यटकांचाही लाडका आहे.
हरवळे धबधब्याजवळ सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही.
केरी (ता. सत्तरी, उत्तर गोवा जिल्हा) येथून अंजुणे धरणाचा जलाशय आणि निसर्ग सौंदर्य पाहताना पर्यटक.