गोव्यात ठिकठिकाणी होणार नरकासुराचे दहन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 23:05 IST2018-11-05T23:01:46+5:302018-11-05T23:05:28+5:30

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या आक्राळ- विक्राळ प्रतिमा गोव्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.
अनेक ठिकाणी असलेल्या नरकासुरच्या प्रतिमा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
याचबरोबर, नरकासुराच्या देखाव्यासाठी अनेक मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या पहाटे म्हणजे मंगळवारी सकाळी नरकासुराच्या प्रतिमांचे दहन करण्यात येते.
माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा, असा या मागचा हेतू असतो. (सर्व फोटो - गणेश शेटकर)