गोव्यात कामगारांच्या देशव्यापी बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 8:40 PM
1 / 10 विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला गोव्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. 2 / 10 खाजगी बसेस, फेरीबोटी बंद राहिल्याने प्रवाशांची परवड झाली. 3 / 10 कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणल्या होत्या परंतु त्या अपुºया पडल्या. लोकांना कदंब बसगाड्यांची तासन्तास वाट पहावी लागत होती. 4 / 10 राजधानीतील बस स्थानकावर सकाळी एक दोन खाजगी बसेस आल्या. 5 / 10 खाजगी बसेस नंतर बंद ठेवण्यात आल्या. 6 / 10 रिक्षा, मोटरसायकल पायलटांनी व्यवसाय चालू ठेवला त्यामुळे त्यांची बरीच कमाई झाली. 7 / 10 बाजारपेठा चालू होत्या परंतु लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. डिचोलीत बुधवारी आठवड्याच्या बाजारावरही परिणाम झाला. 8 / 10 चोडण आणि दिवाडी येथील फेरीबोटी सकाळी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. 9 / 10 बस स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 10 / 10 सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर दहा कामगार संघटनांनी संपाची हाक दिली होती. आणखी वाचा