गोव्यात ख्रिसमसची धामधूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:22 IST2018-12-28T21:18:26+5:302018-12-28T21:22:50+5:30

पणजी : ख्रिसमसनिमित्त गोव्यात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाईने घरे आणि गोठे सजले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. कुडतरी येथे तलावात केलेला गोठा लोकांना आकर्षित करत आहे.

मायणा येथे अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ब्राझील येथील जीजसच्या पुतळ्याची प्रतिकृती केली आहे.

राशोल येथे बनविण्यात आलेला गोठा.

राय येथे गोठ्याचा देखावा पाहण्यासाठी झालेली गर्दी.

आगाशी येथे शेकडो ख्रिसमस स्टार्सनी सजविलेले घर. (सर्व छाया: पिनाक कल्लोळी)