OMG : त्यानं GOAL केला अन् 'ती' व्हायरल झाली; तुम्हालाही 'बोल्ड' करेल ही फोटोगॅलरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:54 IST2020-03-09T16:50:07+5:302020-03-09T16:54:09+5:30

मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी हे इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉलमधील दोन कट्टर प्रतिद्वंद्वी. वर्षानुवर्षे या क्लब्समध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. त्यामुळेच या दोन क्लब्सच्या सामन्यांना फुटबॉलप्रेमींची तौबा गर्दी जमते.
तशीच गर्दी रविवारच्या सामन्यातही पाहायला मिळाली. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडनं आपल्या घरच्या मैदानावर मँचेस्टर सिटीचा २-० असा पराभव केला.
अँटोनी मार्शल ( ३० मि.) याने युनायटेडसाठी पहिला गोल केला. त्यात भरपाई वेळेत ( ९०+६ मि.) स्कॉट मॅकटॉमियनने भर घातली आणि युनायटेडचा विजय पक्का केला.
या सामन्यात अँटोनी मार्शल हा खरा नायक ठरला. पण, या सामन्यानंतर त्याची नव्हे तर त्याच्या पत्नीची चर्चा सोशल मीडियावर अधिक रंगली.
अँटोनीची पत्नी मेलानीए ही तो सामना लाईव्ह पाहत होती आणि अँटोनीच्या गोलनंतर तिनं जल्लोष करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी नेटकरी सोशल मीडियावर तुटून पडले.
२८ वर्षीय मेलानीए ही मॉडल आणि टीव्ही स्टार आहे. मेलानीए नेहमी पतीला चिअर करण्यासाठी मैदानावर उपस्थित असते.
२०१६ मध्ये अँटोनी आणि मेलानीए यांची भेट झाली. मेलानीए आयुष्यात आल्यानंतर अँटोनीने त्याची होणारी पत्नी समांथा जॅकलीनेटला सोडलं.
२०१८मध्ये अँटोनी आणि मेलानीए या प्रेमी युगुलानं मुलाला जन्म दिला.
बिग ब्रदर या रिअॅलिटी शोमध्ये मेलानीएनं २०१५ मध्ये भाग घेतला होता.
पण, ७८व्या दिवशी तिला शोमधून गाशा गुंडाळावा लागला.
इंस्टाग्रामवर तिचे २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.