Cristiano Ronaldo गर्लफ्रेंडला महिन्याला किती पॉकेट मनी देतो माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:21 PM2020-02-24T15:21:21+5:302020-02-24T15:27:22+5:30

पोर्तुगाल संघाचा आणि युव्हेंटस क्लबचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

पोर्तुगाल संघाचा आणि युव्हेंटस क्लबचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात महागडा खेळाडू आहे. ट्विटरवर एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. त्याच्या एका पोस्टची किंमत ही 6.5 कोटी आहे.

ट्विटवरच नाही तर इंस्टाग्रामवरही तो एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये घेतो. इस्टाग्रामवर रोनाल्डोचे 204 मिलियन म्हणजेच 20.4 कोटी चाहते आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवरून त्याला मिळणारा इन्कम याचा हिशोबच न केलेला बरा.

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्येही रोनाल्डो 109 मिलियन डॉलर उत्पनासह आघाडीवर आहे. प्रचंड पैसा असलेल्या या खेळाडूचं रहाणीमानही तितकंच आलीशान असल्यास आश्चर्य वाटायला नको.

आता रोनाल्डोचा थाट इतका असेल तर त्याच्या नातेवाईकांचा विशेषतः गर्लफ्रेंडचा थाट काय असेल, याचा अंदाज बांधूनच थक्क व्हायला होईल.

जॉर्जिया रॉड्रीगेज असे रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचे नाव असून तिचा थाटच न्यारा आहे. रोनाल्डो तीन वर्षांपासून 25 वर्षीय रॉड्रीगेजला डेट करत आहे. जॉर्जिया रोनाल्डोच्या चार मुलांची काळजी घेते.

रोनाल्डीची गर्लफ्रेंड आणि साधं आयुष्य जगेल, असं होणे नाही. रोनाल्डोप्रमाणे तिचेही रहाणीमान आलीशानच आहे आणि तिनं तसंच रहावं यासाठी रोनाल्डो दर महिना बक्कळ पॉकेट मनीही देतो.

स्पेनच्या जाका शहरात जन्मलेल्या जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे. लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची.

2016मध्ये रोनाल्डोसोबत अनेकदा डेटवर दिसल्यानं ती चर्चेत आली. नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले.

रोनाल्डोची प्रेयसी ही ओळख बनण्यापूर्वी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची. त्या स्टोरमध्येच रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्यात नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत.

जॉर्जियानं 93 हजार पॉउंडची म्हणजे 85 लाखांची G-Wagon ही कार गिफ्ट केली. या गाडीचा ताशी वेग 136.7mph इतका आहे.

इतकं महागडं गिफ्ट देणाऱ्या जॉर्जियाला महिन्याला तितकाच तगडा पॉकेट मनी मिळत असेल हे नक्की. स्पॅनीश चॅनेल टेलेसिंकोनं दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डो जॉर्जियाला $85,000 ते $162,000 इतका पॉकेट मनी देतो.

भारतीय रक्कमेत बोलायचे झाल्यास 60 लाख 84, 725 ते 1 कोटी 16 लाख 38,412 इतका पॉकेट मनी जॉर्जियाला महिन्याला मिळतो.