बुगाटीपासून फेरारीपर्यंत... रोनाल्डोच्या कार कलेक्शनबद्दल जाणून तुम्हाला बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:49 PM2024-02-05T12:49:20+5:302024-02-05T12:53:30+5:30

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालचा सर्वोत्तम फूटबॉल खेळाडू आहे.

जगातील महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो केवळ आपल्या कामगिरीमुळेच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालचा सर्वोत्तम फूटबॉल खेळाडू आहे. तसेच, तो सौदी प्रीमियर लीग क्लब अल नसरचा कर्णधारही आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आज 39 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने वाचा त्याच्या कार कलेक्शनची खास माहिती...

ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागड्या कार आहेत. त्याच्याकडे फेरारी, बुगाटी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयस आणि बेंटलेसह अनेक महागड्या कार आहेत. एका रिपोर्टनुसार रोनाल्डोकडे दोन रोल्स रॉयस कार आहेत. यामध्ये एका कारची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने आपल्या फेरारी कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे चार फेरारी कार आहेत. फेरारी एफ 12 टीडीएफ यापैकी सर्वात महाग आहे. त्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे 3 बुगाटी कार आहेत. यामध्ये बुगाटी सेंटोडिसीची किंमत जवळपास 65 कोटी रुपये आहे. बुगाटी चिरॉनची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे. याशिवाय, ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.

फोर्ब्सच्या मते, एप्रिल 2022 मध्ये रोनाल्डोची एकूण संपत्ती 849 मिलियन होती. त्याची फॅन फॉलोइंगही लाखोंच्या घरात आहे. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत 800 हून अधिक गोल केले आहेत. या काळात तो क्लब आणि देशाकडून खेळला आहे.