रोनाल्डोसाठी Nothing is Impossible; युव्हेन्टसला मिळवून दिला अविस्मरणीय विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:01 PM2019-03-13T14:01:24+5:302019-03-13T14:06:51+5:30

युव्हेन्टस क्लबने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बुधवारी अविस्मरणीय विजय मिळवला.

०-२ अशा पिछाडीवर पडल्यानंतर चॅम्पियन्स लीग बाहेर पडण्याचे निर्माण झालेले सावट ख्रिस्तीयानो रोनाल्डोने दूर केले.

या सामन्यापूर्वी त्यानं युव्हेन्टसच्या चाहत्यांना दिलेला शब्द रोनाल्डोने पाळला आणि हॅटट्रिक नोंदवून क्लबला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला.

युव्हेन्टसने बुधवारी घरच्या मैदानावर ॲटलेटिको माद्रिदला ३-०(३-२) असे नमवले. युव्हेन्टसने २००५-०६ च्या सत्रानंतर प्रथमच पहिल्या लेगमध्ये हार मानूनही कमबॅक केले.

रोनाल्डोने या सामन्यात दोन अप्रतिम हेडर लगावले आणि पेनल्टी स्पॉट किक वर एक गोल केला.

चॅम्पियन्स लीगमधील रोनाल्डोची ही आठवी हॅटट्रिक ठरली. यासह रोनाल्डोच्या खात्यात चॅम्पियन्सलीगमध्ये सर्वाधिक १२४ गोल्स जमा झाले आहेत.

रोनाल्डोच्या या खेळीनं युव्हेन्टसला १९९६ नंतर प्रथमच चॅम्पियन्सलीग जिंकण्याचा विश्वास वाटू लागला आहिंदी. मागील चार सत्रात त्यांना दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.