फिफा वर्ल्डकपमध्ये 'या' खेळाडूंच्या पार्टनर्सचा पाहायला मिळणार जलवा; मनमोहक अदा पाहून चाहते होतील घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 02:21 PM2022-11-19T14:21:13+5:302022-11-19T14:52:43+5:30

Qatar FIFA World Cup 2022: फिफा विश्‍वचषक 2022 मध्‍ये सहभागी होणाऱ्या 5 स्‍टार फुटबॉलर्सच्‍या पार्टनर्सबद्दल जाणून घेऊया...

फिफा (FIFA) विश्वचषक 2022 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होत आहे. जगातील स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नी आणि गर्लफेंड सु्द्धा स्टेडियमवर चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसतील. दरम्यान, फिफा विश्‍वचषक 2022 मध्‍ये सहभागी होणाऱ्या 5 स्‍टार फुटबॉलर्सच्‍या पार्टनर्सबद्दल जाणून घेऊया...

जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या स्पर्धेत आपली कामगिरी प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज देखील फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये दिसणार आहे. जॉर्जिना रॉड्रिग्ज आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

फिफा विश्वचषक 2022 दरम्यान लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो देखील स्टेडियममध्ये दिसणार आहे. लिओनेल मेस्सी आणि अँटोनेला एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा खूप रोमँटिक आहे.

ब्राझिलचा फुटबॉलर आणि फॉरवर्ड नेमारची गर्लफ्रेंड ब्रुना बियानकार्डी खूप चर्चेत असते. ब्रुना बियानकार्डीचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. ब्रुना बियानकार्डीही या स्पर्धेत नेमारला सपोर्ट करताना दिसणार आहे.

उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेझची पत्नी सोफिया बलबी सुद्धा फिफा विश्वचषक 2022 साठी कतारला पोहोचली आहे. सोफिया बलबी उरुग्वेच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसू शकते.

जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू थॉमस मुलर आपल्या खेळासाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. थॉमस मुलरची पत्नी लिसा मुलर देखील सोशल मीडिया सेंसेशन आहे. लिसा मुलरचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.