अशा विचित्र पदार्थांची चव तुम्ही कधी चाखली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 03:47 PM2019-10-12T15:47:26+5:302019-10-12T15:54:37+5:30

पदार्थांची चव वाढविण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये काही प्रयोग यशस्वी होतात पण काही एवढे विचित्र होतात की, अगदी नको वाटतं. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच काही चित्र-विचित्र फूड कॉम्बिनेशन्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही.

कढी-भात ऐकलं असेल पण कधी कढी आणि नूडल्स ऐकलं आहे का? विचित्र वाटलं ना ऐकून. पण काही लोक स्पायसी न्यूडल्ससोबत कढी खाणं पसंत करतात.

दोन्ही पदार्थ फार टेस्टी आहेत पण वेगवेगळे. एकत्र खाणं कदाचितच कोणाला तरी आवडेल.

Nutella म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही Nutella Dosa खाणं पसंत कराल का? अनेकांना हा पदार्थ आवडतो.

पिझ्झा वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केला जातो. परंतु, पिझ्झा आणि मध एकत्र खाण्याचा विचार तुम्ही करू शकता का? कदाचित तुम्हाला ऐकून विचित्र वाटले पण अनेक लोक हे खाणं पसंत करतात.

लोणच्यासोबत भात खाणं ठिक आहे. पण तुम्ही कधी Ketchup सोबत भात खाल्ला आहे का?

आंबा आपल्या सर्वांनाच आवडतो. पण तुम्ही हा लाल मिरचीसोबत खाणार का?

चॉकलेट आणि चिप्स एकत्र खाणं थोडं विचित्र वाटत असलं तरिही अनेक लोक हे दोन्ही पदार्थ एकत्र खातात. त्यामुळे काही नवीन ट्राय करायचं असेल तर एकदा नक्की ट्राय करू पाहा.

आपल्यापैकी बरेचजण चहासोबत बिस्किट्स खातात पण काहीजण पाण्यासोबतही बिस्किट्स खातात. चॉकलेट क्रिम बिस्किट आणि ऑरेंज ज्यूस फारच विचित्र आहे.

चॉकलेट गोड असते तर मिरची तिखट. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं म्हणजे, थोडसं विचित्रच नाही का?

बटर, चीझ पॉपकॉर्न तुम्ही खाल्ले असतील पण कधी पॉपकॉर्न आणि केचअप एकत्र खाल्लं आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण काही लोक फार आवडीने हे खातात.

पीनट बटरचं सॅन्डविच तुम्ही ऐकलं असेल पण पीनट बटर आणि आंबा असं काही ऐकलं आहे का? ऐकायलाच एवढं विचित्र वाटतंय तर चवीला कसं असेल याचा विचारही करवत नाही.

आता तर हद्दचं झाली बाई... पॉपकॉर्न आणि आइस्क्रिम एकत्र खाणं कसं शक्य आहे?