दिवसाची सुरुवात करा 'या' पौष्टिक नाश्त्याने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 18:37 IST2019-06-11T18:25:17+5:302019-06-11T18:37:21+5:30

पचनास हल्की व मऊ इडली, ओट्सचा वापर करुन तुम्ही इडली बनवू शकता. दक्षिण भारतात इडली खाण्याचं प्रमाण जास्त आहे.
दिवसाच्या किंवा रात्रीच्या उरलेल्या दाळीपासून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं पराठे बनवू शकता. पराठे चवीला स्वादिष्ट असतात.
गुजरातींच्या पसंतीचे थेपले, यामध्ये कॅलरीज् कमी प्रमाणात असतात व हा एक पौष्टिक पदार्थांपैकी एक उत्तम पर्याय आहे.
रवा उपमा अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे.
थोड्याशा तेल व मिठामध्ये शेवया करुन सकाळच्या नाश्त्यामध्ये खाव्यात.
पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ म्हणजे मिसळ पाव. यामध्ये निरनिराळ्या प्रकाराच्या भाज्यांचा समावेश असतो.