1 / 8दूध एक उत्तम न्यूट्रिशन्स फूड आहे, ज्याबाबत कोणतचं दुमत नाही. यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळून येतं. जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आणि दातांसाठी अत्यंत आवश्यक आहे. हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर्सही दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, दूध प्यावं तर कोणतं....? गाईचं की म्हशीचं... दोन्हीपैकी कोणतं दूध शरीरासाठ जास्त पोषक ठरतं? खरं तर दोन्ही दूधांचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे आहेतच पण काही तोटेदेखील आहेत. जाणून घेऊया तुमच्यासाठी काय फायदेशीर ठरेल त्याबाबत...2 / 8गायीच्या दूधामध्ये म्हशीच्या दूधाच्या तुलनेत फॅट्स कमी असतात. त्यामुळे म्हशीचं दूध गायीच्या दूधाच्या तुलनेत जास्त घट्ट असतं. गायीच्या दूधामध्ये 3 ते 4 टक्के फॅट्स असतात. तर म्हशीच्या दूधामध्ये 7 ते 8 टक्के फॅट्स असतात. म्हशीचं दूध पचण्यासाठी जड असतं त्यामुळे तुम्हाला जास्त फॅट्स घ्यायचे नसतील तर आहारामध्ये गायीच्या दूधाचा समावेश करू शकता. 3 / 8जर तुम्ही पाणी कमी पित असाल तरिही शरीराला पाण्याची कमतरता भासू द्यायची नसेल तर गायीचं दूध पिऊ शकता. गायीच्या दूधामध्ये 90 टक्के पाणी असतं, जे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. 4 / 8म्हशीच्या दूधामध्ये गायीच्या दूधाच्या तुलनेत 10 ते 11 टक्क्यांनी जास्त प्रोटीन असतं. प्रोटीनमुळे हे हीट रेजिस्टंट असतात. त्यामुळे वृद्ध माणसं आणि नवजात मुलांना देण्यासाठी मनाई केली जाते. 5 / 8म्हशी आणि गायीच्या दूधामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वेगवेगळे असतात. म्शशीच्या दूधामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे हायपर टेन्शन, किडनी प्रॉब्लेम्स किंवा लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. 6 / 8म्हशीच्या दूधामध्ये प्रोटीन आणि फॅट्स जास्त असतात. म्हणजेच कॅलरीही मोठ्या प्रमाणात असतात. म्हशीच्या एक कप दूधामध्ये 273 कॅलरी असतात. तसेच गायीच्या एक कप दूधामध्ये 148 कॅलरी असतात. 7 / 8जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर म्हशीचं दूध पिऊन झोपा. तसेच पनीर, खवा, दही, खीर, कुल्फी, तूप यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी म्हशीचं दूध उत्तम ठरतं. तसेच गायीच्या दूधामध्ये चिकटपणा कमी असतो, त्यामुळे मिठाई तयार करण्यासाठी या दूधाचा वापर करावा. 8 / 8टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.