नऊवारीत साडीत अभिनेत्री फिरतेय लंडनच्या रस्त्यावर, पाहून तुम्हालाही वाटेल अप्रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 20:14 IST2021-07-26T20:05:13+5:302021-07-26T20:14:09+5:30

मराठमोळी अभिनेत्री कृतिक गायकवाडने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण थेट लंडनच्या रस्त्यांवर तिने नऊवारी साडी परिधान करत भटकंती केली आहे.

नऊवारी साडी आणि तेही लंडनमध्ये वाचून थोडे आश्चर्यही वाटलं असणार.

होय,लंडनमध्ये महाराष्ट्राची शान नऊवारी साडी परिधान करत कृतिकाने फिरण्याचा आनंद लुटला आहे.

मराठमोळ्या पद्धतीने साडी आणि दागदागिने परिधान केले आहेत.

कृतिकाने तिचे खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

नऊवारी साडीत कृतिकाच्या सौंदर्यालाही चारचाँद लागले आहेत.

नऊवारी साडीतल्या विविध अदाही तिने कॅमे-यात कॅप्चर केल्या आहे.

लंडनमध्ये विविध ठिकाणांना भेट दिल्याचे या फोटोत पाहायला मिळतंय.

नऊवारी साडी आणि नाकात नथ,हातात बांगड्या,कपाळावर टिकली असा साजश्रृंगार केल्याचे पाहायला मिळतंय

कृतिका गायकवाडचा पारंपरिक अंदाज पाहून चाहतेही तिचे कौतुक करताना दिसत आहे.