‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतली नलू ख-या आयुष्यात आहे ग्लॅमरस, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:59 IST2021-03-10T15:49:24+5:302021-03-10T15:59:57+5:30
Deepti ketkar Glamorous Look छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे.अभिनेत्री दिप्ती केतकर नावावरुन कोण ही असा प्रश्न तुम्हाला पडेल.

ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी दिप्ती हे नाव काही नवीन नाही. स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत.
त्यांच्या लूकचीही तितकीच चर्चा होताना दिसतेय. अभिनेत्री दिप्ती केतकर या मालिकेत नलिनी म्हणजेच नलूच्या भूमिकेत आहे.
सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असले तरी दिप्ती केतकरच्या नलूने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या मालिकेत नेहमीच साडीमध्ये ती पाहायला मिळते. अगदी साधारण अशा लूकमध्ये तिला ओळखणेही कठीण जाते.
मात्र रिअल लाइफमध्येही नलू अर्थात दिप्ती तकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. रिअल लाइफमध्ये दिप्तीला मॉर्डन रहायला आवडतं.
तिचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
इन्स्टाग्रामवर विविध अंदाजातील फोटो पाहून हिच का ती असा प्रश्न चाहत्यांना पडल्याशिवाय राहत नाही.
या प्रत्येक फोटोमधील दिप्तीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.
या सगळ्या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर दिप्तीने शेअर केले आहेत.
तिचा रिअल लाईफ अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.