९०च्या काळातील खतरनाक व्हिलन 'स्पॉट नाना' उर्फ रामी रेड्डी अचानक कुठे गायब झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 12:45 IST2022-01-06T12:34:45+5:302022-01-06T12:45:53+5:30

Rami Reddy : रामी रेड्डींना त्यांच्या बॉलिवूड सिनेमातील व्हिलनच्या भूमिकांमुळे जास्त ओळख मिळाली होती. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत त्यांना चरित्र भूमिकांसाठी ओळखलं जात होतं

बॉलिवूड सिनेमे हे व्हिलनशिवाय पूर्ण होत नाहीत. आजही अनेक सिनेमांमध्ये व्हिलन असतातच. खासकरून ८० आणि ९० च्या काळात व्हिलनच्या भूमिका हिरो इतक्याच दमदार राहत होत्या. पण काळानुसार आता व्हिलनमध्ये बदल झाला आहे. ८०-९०च्या काळात व्हिलन हिरोच्या परिवाराला संपवत होता आणि मग हिरो बदला घ्यायचे. पण आता २१ व्या शतकात व्हिलन बदलले आहे.

८०-९०च्या काळात प्राण, प्रेम चोप्रा, अजीत, रंजीत, अमजद खान, अमरीश परी, डॅनी डेंज़ोंग्पा, शक्ती कपूर, किरण कुमार आणि गुल्शन ग्रोवरसहीत अनेक व्हिलन लोकप्रिय झाले होते. यातच एका साऊथच्या व्हिलनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो व्हिलन म्हणजे नाना स्पॉट उर्फ चिकारा उर्फ रामी रेड्डी. रामी रेड्डी आपल्या दमदार अभिनयाने पडद्यावर छाप पाडायचे.

रामी रेड्डी यांचा जन्म १ जानेवारी १९५९ ला आंध्र प्रदेशच्या वाल्मीकिपुरममध्ये झाला होता. त्यांचं पूर्ण नाव गंगासानी रामी रेड्डी असं होतं. ते हिंदीसोबतच साऊथ फिल्स इंडस्ट्रीतही काम करत होते. रेड्डी यांनी १९८० मध्ये हैद्राबादच्या उस्मानिया यूनिव्हर्सिटीमधून बॅचलर इन जर्मालिझम केलं होतं. साऊथच्या सिनेमांमध्ये दिसण्याआधी त्यांनी जर्नलिस्ट म्हणून Mf Daily मध्ये काम केलं होतं.

रेड्डी यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात १९९० मध्ये आलेल्या तेलुगु 'अंकुसम'मधून झाली होती. यानंतर १९९० मध्ये 'प्रतिबंध' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. यात त्यांनी गॅंगस्टर नाना स्पॉटची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या अनेक सिनेमात ते व्हिलन म्हणून दिसले. बॉलिवूडमध्ये 'वक्त हमारा है'ने त्यांचं नशीब बदललं.

रामी रेड्डी यांनी १९९३ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीच्या 'वक्त हमारा है' सिनेमात कर्नल 'चिकारा' ची भूमिका साकारली होती. यातील 'चिकारा'ची भूमिका प्रेक्षक त्याना याच नावाने ओळखू लागले होते. त्यानंतर ते १९९४ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या सुपरहिट 'दिलवाले' मध्येही दिसले होते. रामी रेड्डी यांनी मिथुन चक्रवर्तीसोबत जास्तीत जास्त सिनेमात काम केलं होतं.

रामी रेड्डी यांनी ऐलान (माना शेट्टी), खुद्दार (स्वामी पाटिल), अंगरक्षक (वेल्लु), आंदोलन (बाबा नायक), हक़ीक़त (अन्ना), अंगारा (हौंडा दादा), रंगबाज़ (नंदू), कालिया (भवानी सिंह), लोहा (टकला), गुंडा (काला शेट्टी), चांडाल (दुर्जन राय), दादा (यशवंत) आणि जानवर सिनेमात 'रघु शेट्टी'च्या भूमिका साकारल्या होत्या.

रेड्डींना त्यांच्या बॉलिवूड सिनेमातील व्हिलनच्या भूमिकांमुळे जास्त ओळख मिळाली होती. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत त्यांना चरित्र भूमिकांसाठी ओळखलं जात होतं. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या कॉमेडीच्या टायमिंगासाठी ओळखलं जात होतं. त्यासोबतच ते दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही इंडस्ट्रीत सक्रिय होते. त्यांनी तेलुगु, तमिल, कन्नड़, हिंदी, मल्याळम आणि भोजपुरी भाषेतील सिनेमात काम केलं. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील एकूण २५० पेक्षा अधिक सिनेमात काम केलं.

इतका लोकप्रिय कलाकार पण त्यांचा शेवट कसा झाला हे अनेकांना माहीत नाही. रामी रेड्डी यांना लीव्हर आणि किडनीचा आजार होता. त्यातच त्यांचं १४ एप्रिल २०११ ला सिकंदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय केवळ ५२ वर्षे होतं. रेड्डी यांना लोक आजही नाना स्पॉट आणि चिकारा नावाने ओळखतात.

रामी रेड्डी यांचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा २००३ मधील धर्मेंद्र स्टारर 'टाडा' होता. यात त्यांनी विठ्ठल रावची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीत जास्त सक्रिय झाले. २०१० साली आलेला 'Anaganaga Oka Aranyam' हा तेलुगु सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा होता.