शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Upcoming Web Series & Films: दिवाळी धमाका! ओटीटीवर मिळणार धमाकेदार सीरिज व सिनेमांची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 5:56 PM

1 / 10
उद्या 2 नोव्हेंबरला तामिळ चित्रपट ‘जय भीम’ रिलीज होतोय. हिंदी आणि तेलगूमध्येही हा सिनेमा तुम्ही पाहू शकणार आहात. अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणाºया या चित्रपटात चंदू नामक वकीलाची प्रेरणादायी कथा तुम्ही पाहू शकाल.
2 / 10
3 नोव्हेंबरला प्राईमवर ‘अक्कड बक्कड रफू चक्कर’ ही सीरिजही तुमच्या भेटीस येतोय. दिवंगत दिग्दर्शक व निर्माता राज कौशल यांची ही अखेरची सीरिज आहे. राज कौशल यांचे याचवर्षी जूनमध्ये अकाली निधन झाले. यात अनुज रामपाल, स्वाती सेमवाल, मोहन आगाशे , शिशीर वर्मा व मनीष चौधरी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
3 / 10
नेटफ्लिक्सवर येत्या 5 नोव्हेंबरला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट येतोय. सान्या मल्होत्रा व अभिमन्यू दासानी यात मुख्य भूमिकेत आहेत. विवेक सोनी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
4 / 10
5 नोव्हेंबरलाच सोनी लिव्हवर ‘ट्रिस्ट विद डेस्टिनी’ हा सिनेमा रिलीज होतोय. चार पात्रांची कथा तुम्ही यात पाहू शकाल. यात आशीष विद्यार्थी, जयदीप अहलावत, विनीत कुमार, अमित सियाल मुख्य भूमिकेत आहेत. नशीबाशी लढणाºया या चार पात्रांची कथा प्रशांत नायर यांनी दिग्दर्शित केली आहे.
5 / 10
12 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर ‘रेड नोटिस’ हा अमेरिकन अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा प्रदर्शित होतोय. ड्वेन जॉनसन, रायन रेनोल्ड्स, गैल गैइड यात मुख्य भूमिकेत आहेत.
6 / 10
12 नोव्हेबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर ‘ स्पेशल ऑप्स 1.5’ ही केके मेननची वेबसीरिजही रिलीज होतोय. नीरज पांडेने ही सीरिज दिग्दर्ति केली आहे.
7 / 10
18 नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर ‘मस्त्यकांड’ ही सीरिज तुम्ही पाहू शकाल. यात रवी दुबे, रवी किशन, पीयूष मिश्रा, जोया अफरोज महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
8 / 10
19 नोव्हेबरला ‘द व्हील ऑफ टाइम’ ही सीरिज प्राईमवर रिलीज होतेय. फँटसी, थ्रीलर आणि एपिक जॉनची ही सीरिज हिंदी, तामिळ व तेलगू भाषेत तुम्ही पाहू शकाल.
9 / 10
19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सर कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात कार्तिक टीव्ही अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.
10 / 10
24 नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर मार्वल स्टुडिओची ‘हॉक आई’ सीरिज तुम्ही बघू शकाल. हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम भाषेत ही सीरिज उपलब्धआहे.
टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सWebseriesवेबसीरिज