'माझी तुझी रेशीमगाठ'मधील शेफालीची खऱ्या आयुष्यातील बहिणदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:00 IST2022-11-17T06:00:00+5:302022-11-17T06:00:00+5:30

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे हिने साकारली आहे. तिची बहिणदेखील अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील शेफाली या पात्राला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. ही भूमिका अभिनेत्री काजल काटे हिने साकारली आहे.

काजल काटे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे.

खरेतर अभिनयाची ओढ तिला घरातूनच लागली होती. काजलची बहीणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

काजलच्या बहिणीचे नाव स्नेहा काटे असून या दोघी बहिणींनी सुरुवातीला नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. मग एक एक मालिका स्वीकारत या दोघी बहिणींनी छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख बनवली.

काजलची थोरली बहीण स्नेहा काटे शेलार ही ‘स्नेहा अशोक मंगल’ या नावाने ओळखली जाते.

सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून ती जिजाबाईची भूमिका साकारत होती. मात्र स्नेहा प्रेग्नंट असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे.

चिमुकल्या पावलांची चाहूल लागताच काजल देखील बहिणीसाठी खूपच खूश झालेली पाहायला मिळत आहे.

स्नेहा सोबतचा एक क्युट फोटो शेअर करून तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे स्नेहावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्नेहाचा नवरा देखील प्रसिद्ध अभिनेता असल्याने सेलिब्रिटींनी त्याचेही अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील दौलतराव म्हणजेच अभिनेता ऋषीकेश शेलार हा स्नेहाचा नवरा आहे.

ऋषिकेश आणि स्नेहाने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत एकत्रित काम केले होते.

स्वराज्यजननी जिजामाता, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका तसेच नाटकांमध्ये स्नेहाने काम केले आहे.

तर ऋषिकेशने देखील सावित्रीजोती, स्वराज्यजननी जिजामाता, छत्रीवाली, शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मी सदैव मंगलम या गाजलेल्या मालिका आणि नाटकातून अभिनय साकारला आहे. याशिवाय डॉ तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी त्याला मिळाली होती.