शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोती साबणाने आंघोळ केल्यानंतर..., तेजस्विनी पंडितच्या हटके कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 2:34 PM

1 / 8
ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ना, ते अभिनेत्री तेजस्विनी पंडितला लागू पडतं. अभिनयासोबत ती तिच्या सौंदर्यासाठी आणि जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखली जाते.
2 / 8
तूर्तास चर्चा आहे ती तेजस्विनीच्या एका पोस्टची. होय, स्वत:चे काही ग्लॅमरस, हॉट फोटो तिने शेअर केले आहेत आणि त्याचे कॅप्शन एकदम भारी आहे.
3 / 8
होय, तेजस्विनीने पोस्टला दिलेल्या हटके कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दिवाळीच्या दिवशी मोती साबणाने आंघोळ केल्यानंतर आरशात स्वत:ला न्याहाळतानाचे एक्सप्रेशन...., असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सोबत हसतानाचे स्माईलीही आहेत.
4 / 8
तिचे हे सुंदर, ग्लॅमरस फोटो आणि हटके कॅप्शनवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिज्ञा भावे, सोनाली खरे, सुयश टिळक या सेलिब्रिटींनीही यावर कमेंट्स केल्या आहेत.
5 / 8
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे दर्जेदार सिनेमे, विविध नाटक आणि 100 डेजसारख्या मालिका शिवाय समांतर सारखी वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिकंणारी तेजस्विनी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
6 / 8
सोशल मीडियावर तेजस्विनी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं. याला तिने ‘ट्रॉपिकल’ असं कॅप्शन दिलं आहे.
7 / 8
तेजस्विनी एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री तर आहेच पण त्याचसोबत ती एक सक्सेसफुल बिझनेस वुमन देखील आहे.
8 / 8
अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी मिळून ‘तेजाज्ञा’ हा क्लोथिंग ब्रँड चालू केला होता.
टॅग्स :Tejaswini Punditतेजस्विनी पंडित