डिवॉर्स फोटोशूटमुळे चर्चेत आलेली तरुणी साधीसुधी नाही; साऊथमध्ये आहे तिचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 14:26 IST2023-05-03T14:23:47+5:302023-05-03T14:26:17+5:30
Tamil actress: शालिनीचे फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी तिला हे फोटो डिलीट करायला सांगितले आहेत.

साधारणपणे लग्नाचे, प्री-वेडिंगचे, वाढदिवसाचे वा अॅनिव्हर्सरीचे सगळेच फोटोशूट करतात. मात्र, मध्यंतरी लॉरेन ब्रूक हिचे डिवॉर्सचे फोटोशूट चर्चेत आले.
लॉरेन ब्रूक हिने घटस्फोट झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी खास डिवॉर्स फोटोशूट केलं आणि ती चर्चेत आली. तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने असं फोटोशूट केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर एका दाक्षिणात्य अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे. तिनेदेखील डिवॉर्स फोटोशूट केलं आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील अभिनेत्री शालिनी हिने तिच्या डिवॉर्सचं फोटोशूट केलं आहे.
शालिनीने अलिकडेच तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेत विभक्त झाली. त्यानंतर तिनेही डिवॉर्सचं फोटोशूट केलं.
शालिनी साऊथमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. मुल्लुम मलारुम या शोमुळे ती विशेष लोकप्रिय झाली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शालिनीने रियाज नामक व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. त्यांना रिया ही एक मुलगीदेखील आहे.
शालिनीने घटस्फोट घेत नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला.
शालिनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शालिनीचे फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी तिला हे फोटो डिलीट करायला सांगितले आहेत.