सोनाली कुलकर्णी पतीसोबत व्हेकेशन मोडवर, शेअर केला जिराफसोबतचा मजेशीर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:13 IST2025-09-16T16:00:19+5:302025-09-16T16:13:19+5:30
सोनाली कुलकर्णी सध्या जगभरातील देशांमध्ये फिरताना दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
सोनाली आणि तिचा पती कुणाल हे नैरोबी, केनिया येथील 'जिराफ सेंटर'मध्ये फिरायला गेले आहेत.
सोनालीने जिराफसोबत घेतलेला मजेदार अनुभव चाहत्यांसमोर शेअर केला आहे.
सोनालीने 'जिराफ सेंटर'मधील 'एडी' (Eddie) नावाच्या एका जिराफसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न थोडा मजेदार ठरला.
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू स्पष्ट दिसत आहे, तर जिराफ मात्र सेल्फीसाठी तयार नसलेला दिसतोय.
या फोटोला सोनालीने 'When Eddie chose to say no to my selfie' असं कॅप्शन दिलं आहे.
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनीही खूप लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते.
यावेळी तिच्यासोबत तिचा पती कुणालही सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला.
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.