'सिंघम' फेम अभिनेत्याची पत्नी आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, सेटवर फुलली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 07:00 IST2023-08-10T07:00:00+5:302023-08-10T07:00:00+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेता मुरली शर्मा (Murli Sharma)ची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मा (Murli Sharma)ने बॉलिवूडमध्येच नाही तर साउथ इंडस्ट्रीतही आपले स्थान निर्माण केले आहे. गोलमाल चित्रपटाच्या सीरिज आणि सिंघममधील त्याच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

प्रभासच्या साहो या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करतो.

फार कमी जणांना माहित आहे की त्याची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मुरली शर्माच्या पत्नीचे नाव अश्विनी कळसेकर (Ashwini Kalsekar) आहे. तिने मराठी चित्रपटांतून तिच्या करियरची सुरुवात केली.

अश्विनीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर तिला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका रसिकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेतून मिळाली.

या मालिकेनंतर ती कसम से या मालिकेत झळकली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. अश्विनीने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

अभिनेता मुरली शर्मा आणि अश्विनी काळसेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. ते वास्तविक जीवनातही एक जोडपे आहेत आणि २००९ साली त्यांनी लग्न केले.

कोमल नाहटा यांच्या मुलाखतीत, मुरली शर्माने प्रकाश झा यांच्या अपहरण चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीशी ओळख झाल्याचे सांगितले. मुरली शर्मा म्हणाला की, त्यांची अपहरण चित्रपटादरम्यान मैत्री झाली, नंबरची देवाणघेवाण झाली आणि शेवटी काही काळानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अश्विनी काळसेकरने मुलाखतीत सांगितले की, ते एकमेकांचे समीक्षकही आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, एका शॉटमध्ये अभिनय केल्यानंतर दोघेही एकमेकांशी चर्चा करतात की त्यांनी सीनमध्ये योग्य अभिनय केला आहे की नाही. त्यांनी चित्रित केलेल्या पात्रांबद्दल ते त्यांचे इनपुट देखील सामायिक करतात.

अश्विनीचं मुरली शर्मासोबतचे हे दुसरे लग्न आहे. १९९८ साली अभिनेता नितीश पांडे यांच्याशी लग्न केले होते. परंतु २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गोलमाल फ्रँचायझीमधील त्यांच्या कामासाठी या जोडप्याला प्रशंसा देखील मिळाली आहे.