शिवानी झाली गणपुळेंची सून! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, पाहा व्हेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:01 IST2025-01-22T08:53:36+5:302025-01-22T09:01:36+5:30

अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत. आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलीय.

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नाची जोरादार चर्चा सुरु होती. त्यांच्या लग्नाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते.

अखेर २१ जानेवारी २०२५ रोजी या दिवशी अंबर आणि शिवानी लग्नबेडीत अडकले आहेत. आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलीय.

शिवानी आणि अंबरच्या लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता.

अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली होती. आता त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे.

आपल्या लग्नासाठी दोघांहीनी सुंदर अशी वेशभूषा केली आहे. शिवानीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर नाकात नथ, गळ्यात नेकलेस घालून लूक पूर्ण केलाय. तसेच तिने आबोली रंगाचा शेला घेतलाय.

अंबरने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेऊन लग्नात खास लूक केला आहे. या नवोदित जोडप्यावर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवानी सोनारने 'राजा राणीची गं जोडी' 'तू भेटशी नव्याने' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

तर अंबर गणपुळेने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळालीय.