सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम 'अद्वैत' करतोय 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट; अभिनेत्रीने गाजवलेलं मराठी Bigg boss
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:59 IST2023-03-03T11:41:44+5:302023-03-03T11:59:42+5:30
Ajinkya Nanaware : आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असता. यात खासकरुन तिच्या लव्हलाईफविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता असते.

आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असता. ते कुठे रहातात, त्यांच्या कुटुंबात कोणकोण लोक आहेत. ते कोणाला डेट करतायेत हे जाणून घेण्याची उत्सुकता असतात. (Photo Instagram)
आज आम्ही तुम्हाला झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अव्दैतच्या पर्सनल आयुष्याबाबत सांगणार आहोत. (Photo Instagram)
अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्रील डेट करतोय. (Photo Instagram)
अजिंक्य ननावरे सध्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अद्वैतची भूमिका साकारतो आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीदेखील मिळते आहे. (Photo Instagram)
अजिंक्यने याआधी 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सख्या रे', 'गर्ल्स हॉस्टेल' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. (Photo Instagram)
अजिंक्य गेल्या आठ वर्षांपासून अभिनेत्री शिवानी सुर्वेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. बिग बॉस मराठीच्या घरात प्रचंड राडे करणाऱ्या शिवानीने याच घराक किशोरी शहाणेसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. (Photo Instagram)
तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram)
शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या बॉयफ्रेंड अजिंक्यसोबतचे फोटो शेअर करत असते.(Photo Instagram)
'देवयानी', 'बिग बॉस मराठी' अशा गाजलेल्या मालिका, कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे.(Photo Instagram)
उत्तम अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेही शिवानीने कलाविश्वात तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. (Photo Instagram)