बाबो! ‘पुष्पा’च्या एका आयटम साँगसाठी सामंथा रूथ प्रभुने वसूल केली इतकी मोठी रक्कम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 11:32 IST2021-11-18T11:26:31+5:302021-11-18T11:32:49+5:30
घटस्फोटानंतर लगेच Samantha Ruth Prabhuने ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला. या बातमीने सामंथाचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करतेय.

साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु लवकरच अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा पहिला पॅन इंडिया सिनेमा ‘पुष्पा’मध्ये दिसणार आहे. होय, या चित्रपटात सामंथा एका धमाकेदार आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.
सामंथा आयटम साँग करणार म्हटल्यावर चाहते क्रेझी झाले आहेत. या आयटम साँगसाठी सामंथाने म्हणे मोठी रक्कम वसूल केली आहे.
होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा’मधीलकाही मिनिटांच्या डान्स नंबरसाठी सामंथाने 1.5 कोटी रूपये इतके मानधन घेतलं आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती नाही.
सामंथाचा नुकताच घटस्फोट झाला. गेल्याच महिन्यात सामंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केले होतं. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघेही विभक्त झाले होते.
लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे, इतकंच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची. हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना खटकत होती, असं म्हटलं जातंय.
अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर सामंथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती. सामंथाला हा विरोध, ही बंधनं खटकतं होती आणि याच कारणामुळे तिने नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे.
घटस्फोटानंतर लगेच सामंथाने ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला. या बातमीने सामंथाचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करतेय.
‘पुष्पा’ हा सिनेमा तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.