पार्टी नाही पण सेलिब्रेशन तर होणारच! ‘भाईजान’ सलमानने असा साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 10:31 IST2020-12-27T10:18:00+5:302020-12-27T10:31:50+5:30
हॅपी बर्थ सलमान, पाहा बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करतोय. भाईजानचा वाढदिवस म्हटला की, जंगी पार्टी आलीच. पण यंदा कोरोना महामारीमुळे यंदा कोणतीही जंगी पार्टी झाली नाही. पण त्याच्या कुटुंबाने व खास मित्रांनी पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. अर्थात अगदी साधेपणाने.
फिक्या रंगाचा शर्ट आणि डेनिममध्ये सलमान कूल दिसत होता.
सलमानला बर्थ डे विश करण्यासाठी त्याचे वडील सलीम खान पनवेल फार्म हाऊसवर पोहोचले.
सलमानची लाडकी बहीण अलवीराही कुटुंबासोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली.
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला होता.
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा हाही सुनील ग्रोव्हरसोबत होता.
भाजपा नेत्या व फॅशन डिझाईनर शायना एनसी या सुद्धा आपल्या मुलांसोबत या छोटेखानी पार्टीत सामील झाल्यात.
राजकीय नेते बाबा सिद्दीकी हे सलमानची जिगरी दोस्त. ते सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये हजर होते.
सलमानने यावेळी मीडियाच्या फोटोग्राफर्ससोबतही बर्थ डे सेलिब्रेशन केले. पापाराझींसोबत त्याने केक कापला. यावेळी त्याचा बॉडीगार्ड शेरा त्याच्यासोबत दिसला.