'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम

By देवेंद्र जाधव | Updated: June 8, 2025 16:38 IST2025-06-08T15:48:27+5:302025-06-08T16:38:05+5:30

'पार्टनर' सिनेमात सलमान खानच्या नाकीनऊ आणणारा छोटा मुलगा सध्या काय करतो? त्याचं बदलतं रुप बघून तुम्ही त्याला ओळखूच शकणार नाही. जाणून घ्या

'पार्टनर' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. सिनेमातील सलमान खान आणि गोविंदा या दोन अभिनेत्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. या सिनेमात सलमानला त्रास देणाऱ्या लहान मुलाने चांगलाच भाव खाल्ला होता.

'पार्टनर' सिनेमातील या बालकलाकाराने त्याच्या मस्तीखोर अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं. याचं नाव अली हाजी. अली आता अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे

अलीने बालकलाकार म्हणून अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. आमिर खानसोबत फना, अमिताभ बच्चन यांच्यासह फॅमिली अशा सिनेमात अली झळकला आहे.

याशिवाय अलीने मोठं झाल्यावर हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमातही काम केलंय. अली आता मात्र अभिनय सोडून एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे

अली आता क्लीन स्लेट स्टूडियो या नावाने स्वतःची प्रॉडक्शन संस्था चालवत आहे. याशिवाय तो विविध प्रोजेक्ट्ससाठी लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळत आहे.

अलीचे सोशल मीडियावर १९ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. अली आजही सलमान खानच्या संपर्कात असून तो करिअरच्या बाबतीत भाईजानकडून टिप्स घेत असतो

अलीचं बदलतं रुप बघून हाच पार्टनरमध्ये सलमानला त्रास देणारा मस्तीखोर मुलगा आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. अली सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.