PHOTOS: जिच्यासोबत सलमान खान चढणार होता बोहल्यावर ती अभिनेत्री झाली ६१ वर्षांची, जाणून घ्या तिच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 16:17 IST2022-07-09T15:51:46+5:302022-07-09T16:17:27+5:30
सलमान खान तिच्या प्रेमात वेडा झाला होता आणि दोघांच्या लग्नाचा पत्रिका देखील छापल्या होत्या

सलमान खान (Salman Khan)चं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडले गेलं आहे. अनेक जणींना डेट भाईजानने डेटदेखील
यात अनेक मॉडल आणि अभिनेंत्रीची नावं सामील आहेत.. पण सलमानने नेहमीच त्यावर मौन बाळगणं पसंत केलं.
सलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो.
सलमानला अनेक मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारलो जातो आणि सलमान हसत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो.
सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani)सोबत सलमान लग्न देखील करणार होता. संगीता आज आपला ६१ वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)
सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा देखील विचार केला होता. दोघांच्या लग्नाचा पत्रिका देखील छापल्या होत्या. (Photo Instagram)
जसीम खान यांनी सलमान खानच्या आयुष्यावर बीईंग सलमान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, संगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. (Photo Instagram)
संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती. पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने या गोष्टीविषयी अनेक वर्षांनंतर मीडियात कबूल देखील केले होते.(Photo Instagram)
सलमानसोबत लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)
संगीता आणि सलमानच्या ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानच्या घरातील समारंभात, पार्टींना ती आवर्जून हजेरी लावते. (Photo Instagram)