दोन वेण्यांमध्ये क्युट दिसतेय आर्ची, रिंकू राजगुरुने शेअर केले वाढदिवसाचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:43 IST2025-06-04T13:34:17+5:302025-06-04T13:43:13+5:30

रिंकू काल २४ वर्षांची झाली, असं केलं सेलिब्रेशन

'सैराट'फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) काल २४ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या अगणित चाहत्यांनी रिंकूवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

रिंकू राजगुरुने नुकतेच तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी साध्या लूकमध्ये दिसतेय.

फुल स्लीव्ह्ज व्हाईट स्वेटशर्ट, जीन्स आणि दोन वेण्या असा तिचा क्युट लूक आहे. गवतावर बसून हाताने हार्ट बनवत तिने सर्वांचे आभार मानलेत.

रिंकूसाठी खास चॉकलेट केकही मागवलेला दिसतोय. विविध रंगांचे फुगे लावून खोली सजवण्यात आली आहे. टेबलवर केक ठेवलेला आहे आणि रिंकू केक कट करताना दिसतेय.

यानंतर तिने गवतात बसून आणखी फोटो शेअर केलेत. यात तिने एकापेक्षा एक गोड पोज दिल्या आहेत. तसंच या फोटोंमध्ये तिची किलर स्माईल लक्ष वेधून घेत आहे.

रिंकू आगामी 'साडे माडे तीन'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. तसंच तिच्या इतर प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.