'तुम बिन'मधील हा अभिनेता आठवतो का? एकेकाळी हॅण्डसम हंक असणारा हिमांशू मलिक आता दिसतो प्रचंड वयस्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:05 IST2022-01-28T16:02:23+5:302022-01-28T16:05:40+5:30
Himanshu Malik: असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या हिमांशूचा कलाविश्वातील वावर सध्या कमी झाला आहे. इतकंच नाही तर तो कमालीचा बदलला आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही चाहत्यांसाठी कठीण आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला 'तुम बिन' चित्रपट आठवतोय का? हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता.
राकेश बापट, प्रियांशू चटर्जी, संदली सिन्हा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे या कलाकारांसोबतच आणखी एका अभिनेता झळकला होता, तो म्हणजे हिमांशू मलिक.
त्याकाळी या चित्रपटातील सर्वात हॅण्डसम हिरो म्हणून त्याने तरुणींच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. या चित्रपटामुळे हिमांशू रातोरात सुपरस्टार झाला होता.
'तुम बिन'मुळे चर्चेत आलेल्या हिमांशूचा या चित्रपटानंतर अचानकपणे कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे हा अभिनेता आता कसा दिसतो, काय करतो असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. म्हणूनच, हिमांशू मलिकविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.
हिमांशूने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
सोनू निगमच्या दीवाना या अल्बममध्ये तो पहिल्यांदा झळकला होता. त्यानंतर तो १९९६ मध्ये 'काम सूत्रः द टेल ऑफ स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात केली.
हिमांशू जंगल, एलओसी कारगिल, ख्वाहिश, रोग, रेन यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे.
असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या हिमांशूचा कलाविश्वातील वावर सध्या कमी झाला आहे. इतकंच नाही तर तो कमालीचा बदलला आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही चाहत्यांसाठी कठीण आहे.