कैरीचा आस्वाद घेताना दिसली 'देसी गर्ल'; स्ट्रॅपलेस बिकिनीमध्ये ४३ वर्षीय प्रियंकाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:38 IST2026-04-07T16:30:46+5:302026-04-07T16:38:48+5:30
प्रियंकाचा हा 'बोल्डनेस' पाहून चाहते तिच्यावरून नजर हटवू शकत नाहीयेत.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

प्रियंकाचे सौंदर्य आणि तिची फॅशन सेन्स नेहमीच चाहत्यांना भुरळ घालते, पण आता तिने शेअर केलेल्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पूलसाईड निवांत क्षणांचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती काळ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस बिकिनीमध्ये अत्यंत हॉट आणि आकर्षक दिसत आहे.

डोळ्यांवर स्टायलिश सनग्लासेस लावून प्रियंका पूलमध्ये आरामात पोहताना दिसत असून, तिचा हा बिनधास्त अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

उन्हाच्या कडाक्यात स्विमिंग पूलमध्ये पोहताना प्रियंका चोप्रा चक्क कैरीवर ताव मारताना दिसली आहे.

दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका पावडर ब्लू रंगाच्या बिकिनीमध्ये पूलजवळ बसलेली दिसत आहे. मोकळे केस तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.

प्रियंकाचा 'बोल्डनेस' पाहून चाहते तिच्यावरून नजर हटवू शकत नाहीयेत. प्रियंका चोप्रा प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असली, तरी ती आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला कधीच विसरत नाही.

यावेळी प्रियंकाने आपली लेकी आणि आईसह निवांत क्षण घालवल्याचं पाहायला मिळालं. या फोटोंमध्ये प्रियंकाची आई मधू चोप्रा आणि मुलगी मालती मेरी दिसत आहेत.

प्रियंका नेहमीच आपल्या आईच्या जवळ राहिली आहे. वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईची पूर्ण काळजी घेते.

सध्या प्रियंका 'वाराणसी' (Varanasi) या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंका ही महेश बाबूसोबत झळकणार आहे.

















